विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : सूर्यमालेच्या टोकाला आढळला गॉबलिन नावाचा नवा बटू ग्रह


आपली सूर्यमाला चित्रविचित्र गोष्टींनी भरलेली आहे. सूर्यमालेबद्दलचे संशोधन जसजसे होत आहे, तसतसे त्यांची माहिती आपल्याला होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपली सूर्यमाला अधिक चांगल्या पद्धतीने कळण्यास सुरवात झाली आहे. कुईपर बेल्टमध्ये असलेल्या अनेक लघुग्रहांची माहिती नव्याने होत आहे. गॉबलिन नावाचा नवा बटू ग्रहही आपल्याला सूर्यमालेच्या टोकाला आढळून आला आहे. फारआऊट नावाचा आणखी एक लघुग्रह दोन वर्षांपूर्वीच आढळला आहे. नव्याने सापडलेले हे सर्व लघुग्रह आकाराने अत्यंत छोटे आहेत.At the end of the solar system, a new dwarf planet called Goblin was discovered

या लघुग्रहांच्या पलीकडे अवकाशातील अंधारात मोठा ग्रह अस्तित्वात आहे का? कदाचित तो नववा ग्रह असू शकतो, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या ग्रहाचे वस्तुमान पाच ते दहा पृथ्वींएवढे असू शकते, असे शास्त्रज्ञांना वाटते. पण कदाचित हा नववा ग्रह नसेलही कदाचित. काही शास्त्रज्ञांच्या मते ते एक छोटे कृष्णविवर असावे. हारवर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे अंदाज वर्तविले आहेत. कृष्णविवराकडे सर्व वस्तू खेचल्या जातात, प्रकाशही तेथून परावर्तीत होत नाही.

ज्या भागात कृष्णविवर असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे, त्या भागाची निरीक्षणे केल्यानंतर त्याबाबत काही सांगता येऊ शकेल.. व्हेरा सी. रुबीन प्रयोगशाळा पुढील काही महिने आठव्या ग्रहापलीकडील भागाची छायाचित्रे घेणार आहे. लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाईम असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाद्वारे पुढील दहा वर्षांत विविध खगोलीय घटकांची निरीक्षणे नोंदविली जाणार आहेत. सुमारे ४० हजार नवे खगोलीय घटक या प्रकल्पाद्वारे शोधले जातील. त्यातून सूर्यमालेच्या शेवटी नववा ग्रह आहे की कृष्णविवर हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाईम या प्रकल्पाद्वारे प्रामोर्डिअल ब्लॅक होल शोधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. कदाचित आपल्याच सूर्यमालेत त्यांचे अस्तित्व दिसून येऊ शकेल. व्हेरा रुबीन प्रयोगशाळेची बांधणी सध्या चिलीमध्ये सुरू आहे. या वर्षअखेरीस ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २०२३पर्यंत लिगसी सर्व्हे ऑफ स्पेस अँड टाईमप्रकल्पाद्वारे निरीक्षणे घेतली जाणार आहेत.

At the end of the solar system, a new dwarf planet called Goblin was discovered

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात