या तथाकथित शेतकऱ्यांच्या हट्टामुळे दीर्घकाळ नुकसान, तीन कृषी कायदे रद्द झाल्यावर भारतीय किसान संघाची प्रतिक्रिया


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर भारतीय किसान संघानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Long-term losses due to these so-called farmers stubbornness, reaction of Bhartiy Kisan Union after repeal of three farm laws


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरबनिमित्त आज देशाला संबोधित करत असताना तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. पीएम मोदींच्या या घोषणेनंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर भारतीय किसान संघानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारतीय किसान संघाने एका निवेदनाद्वारे म्हटले की, तिन्ही कृषी कायदे परत घेण्याचा सरकारचा हा निर्णय अनावश्यक वाद टाळण्यासाठी ठीक आहे. हे तथाकथित शेतकऱ्यांच्या हट्टामुळे शेतकऱ्यांचे दीर्घकालीन नुकसान करणारे आहे. या कायद्यांत सुधारणा केल्याने शेतकऱ्यांना, खासकरून छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना जास्त लाभ झाला असता.



त्यांनी पुढे म्हटले की, माननीय पंतप्रधानांनी किमान आधारभूत किंमत आणखी प्रभावी करण्याविषयी सांगितले आहे. आणि यासाठी एक समिती स्थापन करण्याचाही उल्लेख केला आहे. भारतीय किसान संघ याचे स्वागत करण्यासोबतच यात देशाच्या अराजकीय संघटनांचे प्रतिनिधित्व निश्चित करण्याचाही आग्रह करते.

भारतीय किसान संघानुसार शेतकऱ्याची खरी समस्या म्हणजे त्यांचे बाजारात होणारे शोषण आहे. यावर उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य देण्याचा कायदा करून गॅरंटीदेण्याीच गरज आहे.

Long-term losses due to these so-called farmers stubbornness, reaction of Bhartiy Kisan Union after repeal of three farm laws

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात