Komal patel Suicide: आणखी एक हुंडाबळी ! सॉरी पापा… आई एम रियली सॉरी ! अब बर्दाश्त नहीं हो रहा है …


वृत्तसंस्था

रांची : एका रेल्वे कर्मचाऱ्याचा पत्नीचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. झारखंडच्या धनबाद येथील धनसार ठाणा क्षेत्रातील महावीरनगर भूदा येथे बुधवारी ही धक्कादायक घटना घडली . आत्महत्येपूर्वी महिलेने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये तरुणी रडत-रडत सांगत आहे, की सासरचे लोक तिचा छळ करतात. दरम्यान या घटनेनंतर महिलेच्या पतीसह त्याचे संपूर्ण कुटुंब फरार आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कोमल पटेल (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. Komal patel Suicide!Sorry Dad we are going to take this step. I’m really sorry. Can’t stand it anymore. The heart is broken …

काय म्हणाली कोमल?

“बाबा, मी सुसाईड करत आहे. पुन्हा सासरी येऊन खूप मोठी चूक केली. सॉरी पापा, मी तुमचं म्हणणं ऐकलं नाही. मला वाटलं माझा नवरा सुधारला असेल. पण त्याने पुन्हा मला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या, एवढंच तुम्हाला सांगायचं आहे.”



सासरच्या चौघांविरोधात पोलिसात तक्रार

कोमलचे वडील उमेश प्रसाद यांनी तिचा पती आलोक प्रसाद, सासू, नणंद आणि नणंदेचा नवरा अशा सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. कोमलचा हुंड्यासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. सासरची माणसं कोमलकडे गाडी मागत होते, असंही ते म्हणाले. कोमलच्या आत्महत्येनंतर आलोक कुटुंबासह पसार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

दहा लाखांसह दागिने हुंड्यात

धनबादमध्ये राहणारा आरोपी आलोक कुमार हा ग्रुप डी रेल्वे कर्मचारी आहे. २०१८ मध्ये कोमल आणि आलोक यांचा विवाह झाला होता. लग्नात घरातील सामानासह दागिने आणि दहा लाख रुपये कोमलच्या वडिलांनी तिच्या सासरच्या माणसांना दिले होते. मात्र त्यानंतरही हुंड्यासाठी तिला मारहाण सुरुच होती. आता तर तिच्याकडे कार आणण्यासाठी वारंवार दबाव आणला जात होता. या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती अलोक प्रसाद, त्याची आई आणि बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतरास बाजार येथील रहिवासी उमेश प्रसाद यांनी आपली मुलगी कोमलचा विवाह २०१८ मध्ये धनबाद येथील अलोक प्रसादसोबत केला होता. लग्नात घरउपयोगी वस्तू, दागिने आणि १० लाख रुपये दिले होते. दरम्यान लग्नानंतर कोमलच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण करण्यास आणि तिचा छळ करायला सुरुवात केली. या छळाला कंटाळून कोमलने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोमल रडत-रडत आपली व्यथा मांडत आहे. ती यात म्हणते, की मी आत्महत्या करत आहे. सासरी येऊन मी चूक केली. सॉरी बाबा, मी तुमचं ऐकायला हव होते. मला अस वाटल की, माझा पती आता सुधारला आहे. मात्र, त्याने पुन्हा मला मारहाण करायला सुरवात केली आहे.

मरण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे बाबा, माझ्या मुलाची काळजी घ्या. कोमलचे हे शब्द शेवटचे ठरले.

Komal patel Suicide! Sorry Dad we are going to take this step. I’m really sorry. Can’t stand it anymore. The heart is broken …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात