हॉटेल, मनोरंजन पार्कना सवलती जाहीर करणारे कर्नाटक ठरले पहिले राज्य


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : कोरोनाचा फटका बसलेल्या पर्यटन क्षेत्राला करात सवलती देणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य ठरले आहे. हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि करमणूक उद्यानांसाठी मालमत्ता कर, वीज व अबकारी शुल्कात अनेक सवलती येडीयुरप्पा सरकारने जाहीर केल्या आहेत.Karanataka gives benefits for hotels

हॉटेल्स, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि करमणूक पार्क यांना या वर्षात मालमत्ता करात ५० टक्के सूट दिली आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यांतील वीज दरही सरकारने माफ केले आहेत. अबकारी सनद व अतिरिक्त सनदी शुल्कातील ५० टक्के रक्कम सध्या भरावयाची व उर्वरित ५० टक्के रक्कम या वर्षाच्या ३१ डिसेंबरपर्यंत भरण्यासाठी ६ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.



पर्यटन विभागात नोंदणीकृत प्रत्येक पर्यटन मार्गदर्शकासाठी (गाईड) प्रत्येकी ५००० रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Karanataka gives benefits for hotels

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात