पुण्यामध्ये सोमवारपासून निर्बंध जैसे थेच ! ; कोरोनाबाबतच्या आढावा बैठकीत सूतोवाच


वृत्तसंस्था

पुणे : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे. दरम्यान, आठवड्यात पुण्यात निर्बंध जैसे थेच राहणार आहेत.Restrictions in Pune from Monday as earlier ! ;Corona review meeting suggested

पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली. त्यावेळी ते बोलत होते.



डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहतील. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दर वाढ आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहणार आहेत. शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही त्यांनी सांगितलं.

पुणेकरांसाठी सोमवारपासून काय सुरू

  • शनिवारी रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा आणि हॉटेलची पार्सल सेवा सुरू राहणार आहे.
  •  पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील.
  •  रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा/घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहेत.
  •  विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाणार.
  •  नाट्यगृहे, चित्रपटगृह बंदच राहणार

५ जून २०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार.

कृषी संबंधित दुकाने आणि संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील.

Restrictions in Pune from Monday as earlier ! ;Corona review meeting suggested

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात