बहिणीच्या तक्रारीवरून प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलीसांनी घेतले ताब्यात


पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीनेच दिलेल्या तक्रारीवरून बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी परांजपे यांना पुण्यातील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.Mumbai Police arrested Paranjape brothers on the complaint of their sister


विशेष प्रतिनिधी

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बहिणीनेच दिलेल्या तक्रारीवरून बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी परांजपे यांना पुण्यातील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले.

शशांक पुरुषोत्तम परांजपे आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या परांजपे बंधूंची नावे आहेत. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंधरा डोंगरे (वय ६९) यांनी तक्रार दिली आहे.



परांजपे बंधूंवर बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक करणे, तसेच विश्वासघात करणे असे गंभीर आरोप होते. या आरोपांखाली त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईतील विलेपार्ले येथील एका जमीनीच्या प्लॉटचा हा वाद आहे.

मुंबईतील सहकारी गृहरचना सोसायटी निर्माण करण्याच्या कल्पनेचे उद्गाते आणि प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक बाबुराव परांजपे यांची वसुंधरा डोंगरे या कन्या आहेत. त्यांनी आपले सख्खे बंधू जयंत परांजपे यांच्याविरुध्दही तक्रार दिली आहे.

वसुंधरा यांच्या आई सरस्वती परांजपे यांची बनावट सही करून परांजपे बंधूंनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी तयार केली. त्यानुसार विलेपार्ले येथील एक प्लॉट विकसित केला. डोंगरे कुटुंबियांना माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मिळविली. त्यांनी जानेवारी महिन्यातच याबाबत तक्रार केली होती.

Mumbai Police arrested Paranjape brothers on the complaint of their sister

महत्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात