हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधण्याचे जयंत चौधरींचे आश्वासन, योगी आदित्यनाथांवर जोरदार टीका


विशेष प्रतिनिधी

मेरठ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीनंतर राष्ट्रीय लोक दल (रालोद) सत्तेवर आल्यास हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधणे हे पहिले काम करेल असे पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी जाहीर केले.Jayant Chawdhari targets BJP

अखिलेशजी आणि मी एकत्र आलो आहोत. आमचे डबल-इंजिनचे सरकार सत्तेवर येताच चौधरी चरणसिंह यांच्या भूमीत हुतात्मा शेतकऱ्यांचे स्मारक बांधण्याचे पहिले काम करू, असे सांगून ते म्हणाले की, हा लढा जिंकल्याबद्दल आणि मोदी यांना कदाचित प्रथमच झुकण्यास भाग पाडल्याबद्दल मी शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो.



म्हणाले बाबाजींना (योगी आदित्यनाथ) लवकर राग येतो. तुम्ही त्यांना कधीही हसताना पाहिलेले नाही. वासरांबरोबर असतात तेव्हाच त्यांना हसू फुटते. त्यामुळे तुम्ही त्यांना मुक्त करावे, जेणेकरून ते २४ तास वासरांसह खेळू शकतील. त्यांना सरकारी फायली हाताळता येत नाहीत. भाजप द्वेषाची भाषा करते आणि आपले योगी आदित्यनाथ भाषणाची सुरवात औरंगजेबापासून करतात आणि कैरानातील स्थलांतराने शेवट करतात.

Jayant Chawdhari targets BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात