विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांच्या नावाने उत्तर प्रदेशात इन्स्टिट्यूशन; योगी आदित्यनाथ यांची घोषणा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत मृत्यू पावलेले विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांच्या नावाने उत्तर प्रदेशात इन्स्टिट्यूशन असेल, तसेच त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्यात येतील.Institution will be named after wing commander prithvisingh azad in UP

आणि कुटुंबीयांपैकी एका व्यक्तीला सरकारी नोकरीत केले जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.योगी आदित्यनाथ यांनी आज विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान हे उत्तर प्रदेशातल्या आग्रहाचे रहिवासी आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आज नवी दिल्लीत येऊन सीडीएस जनरल बिपिन रावत तसेच अन्य शूर वीर जवानांना देखील श्रद्धांजली अर्पण केली.

त्यानंतर त्यांनी पृथ्वी सिंग चौहान यांच्या परिवाराशी सांत्वन भेट घेतली. एका इन्स्टिट्यूटला पृथ्वी सिंह चौहान यांचे नाव घेण्याचे त्यांनी जाहीर केले तसेच कुटुंबियांना 50 लाख आणि परिवारातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Institution will be named after wing commander prithvisingh azad in UP

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!