हिंदू मतांमध्येही जातीवरून फुट पाडण्याचा ओवेसींचा डाव, योगी आदित्यनाथ यांनी ठाकूरवाद केल्याच आरोप


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात सर्वांना हिंदू बनवले होते. पण योगी आदित्यनाथ यांनी साडेचार वर्षात इतका ठाकूरवाद केला आहे की त्यांचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य स्वत:ला मौर्य जातीचे म्हणवून घेत आहेत.Owaisi’s instinct to divide caste in Hindu opinion too, Yogi Adityanath accused, Allegations that Yogi Adityanath practiced Thakurism

आणि दुसरा उपमुख्यमंत्री म्हणतो, की मी ब्राह्मण आहे,असा आरोप करत एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी हिंदू मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे.एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अँकरने ओवेसींना विचारले की, तुम्ही फक्त १९% लोकांचे राजकारण करण्याबद्दल बोलत आहात?



याला उत्तर देताना ओवेसी म्हणाले, जे बलवान आहेत त्यांच्याबद्दल बोलले जाते पण जे कमकुवत आहेत त्यांच्याबद्दल बोलले जात नाही. जे कमकुवत आहेत त्यांना आधार देऊन वर उचलायचे आहे. उत्तर प्रदेशाचे वास्तव काय आहे, हे मला माहित आहे. येथे शिक्षणापासून बेरोजगारीपर्यंत स्थिती खूप वाईट आहे. केवळ मुस्लिमांची स्थिती वाईट आहे, असे मी म्हणत नाही.

ओवेसींच्या ठाकूरवादाच्या आरोपावर सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, निवडणुकीत जिना यांचे नाव आम्ही नाही तर अखिलेश यादव यांनी घेतले होते. अयोध्या रायझिंग हे पुस्तक भाजपाने लिहिलेले नसून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी लिहिले आहे.

समाजवादी पार्टी ही असदुद्दीन ओवेसी यांची बी टीम असल्याचा आरोप सुधांशू त्रिवेदी यांनी केला. ते म्हणाले की, हे जातीयवादी म्हणून बोलतात पण जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वजण ठाकूर, ब्राह्मण आणि यादव हेच करतात. हे लोक मुस्लिमांमधील सुन्नी, शिया, बरेलवी, हदीस यांवर कधीच का बोलत नाहीत. मी हिंदू-मुस्लिम दंगली कधीच पाहिल्या नाहीत तर सिया-सुन्नी दंगली पाहिल्या आहेत.

Owaisi’s instinct to divide caste in Hindu opinion too, Yogi Adityanath accused, Allegations that Yogi Adityanath practiced Thakurism

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात