गोवा विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तृणमूल कॉँग्रेसशी युती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: गोवा विधानसभा निवडणुकीतील चुरस आता वाढली आहे. पश्चिम बंगालबाहेर प्रथमच ताकदीनिशी उतरलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉँग्रेसने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी (एमजीपी) युती केली आहे. एमजीपी हा भाजपाचा माजी मित्र आहे.New twist in Goa assembly elections, Maharashtrawadi Gomantak Party’s alliance with Trinamool Congress

पत्रकार परिषदेत बोलताना एमजीपीचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीने पुढील वर्षी होणाºया निवडणुकीसाठी टीएमसीसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. युतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत पक्ष नंतर निर्णय घेईल. राज्यातील लोकांना चांगले प्रशासन देण्यासाठी त्यांनी ही युती केली आहे. भाजपच्या विरोधात लाट आहे. लोकांना बदल हवा आहे आणि आम्ही राज्यात सरकार स्थापन करू शकू.एमजीपीकडे भाजपशिवाय पर्याय नाही, असा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप करून ढवळीकर म्हणाले त्यामुळेच 2019 मध्ये भाजपसोबतची युती तोडली. आम्ही नेहमीच भाजपवर टीका करत आलो आहोत. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि टीएमसी यांसारख्या इतर सर्व पक्षांशी आम्ही चर्चा करत होतो.

2017 च्या निवडणुकीत टीएमसीने गोवा विधानसभेत 40 पैकी तीन जागा जिंकल्या होत्या आणि नवीन युती सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला होता. दोन आमदारांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर एमजीपीकडे सध्या फक्त एकच आमदार आहे. तृणमूल काँग्रेस आपला राष्ट्रीय पाया वाढवू पाहत आहे.

पुढील वर्षी गोव्याच्या निवडणुकीत पदार्पण करण्यासाठी स्थानिक मित्रपक्षाच्या शोधात आहे. वर्षभरापूर्वीच भाजपाशी संबंध तोडलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा मिळविण्याचा टीएमसीचा प्रयत्न होता. मात्र, काँग्रेस पक्षाने गेल्या

New twist in Goa assembly elections, Maharashtrawadi Gomantak Party’s alliance with Trinamool Congress

महत्त्वाच्या बातम्या