भारत-पाक सीमेवर झाला बाळाचा जन्म, पाकिस्तानी दांपत्याने मुलाचे नाव ठेवले बॉर्डर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अगदी चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे एका पाकिस्तानी महिलेने भारत-पाक सीमेवर बाळाला जन्म दिला आहे. पाकिस्तानातील या जोडप्याने आपल्या बाळाचे नाव बॉर्डर असे ठेवले आहे.हे पाकिस्तानी दांपत्य गेल्या 71 दिवसांपासून अटारी सीमेवर इतर 97 पाकिस्तानी नागरिकांसह अडकून पडले आहेत.The baby was born on the Indo-Pak border, a Pakistani couple named the border

या बाळाचे पालक निंबूबाई आणि बालम राम हे पंजाब प्रांताच्या राजनपूर जिल्ह्यातील आहे. बाळाचा जन्म भारत-पाकिस्तान सीमेवर झाल्यामुळे त्याचे नाव बॉर्डर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निंबूबाई गरोदर होत्या आणि 2 डिसेंबरला त्यांची प्रसूती झाली. शेजारच्या पंजाबमधील गावातील काही स्त्रिया निंबूबाईंना बाळंतपणात मदत करण्यासाठी आल्या.



 

स्थानिकांनी इतर मदत देण्याबरोबरच प्रसूतीसाठी वैद्यकीय सुविधांचीही व्यवस्था केली. बालम राम यांनी याबाबत माहिती दिली. टाळेबंदीपूर्वी नातेवाईकांना भेटण्यासाठी आणि तीर्थयात्रेसाठी 98 नागरिकांसह ते भारतात आले होते. मात्र, आवश्यक कागदपत्रे नसल्यामुळे ते घरी परत जाऊ शकले नाही. या लोकांमध्ये 47 लहान मुलांचा समावेश आहे, ज्यापैकी सहा भारतात जन्मले आहेत आणि ते एक वषार्पेक्षा कमी वयाचे आहेत, असे ते म्हणाले.

बालम रामव्यतिरिक्त त्याच तंबूत राहणारा आणखी एक पाकिस्तानी नागरिक लगया राम याने आपल्या मुलाचे नाव भारत असे ठेवले. कारण, 2020 मध्ये जोधपूरमध्ये त्यांच्या बाळाचा जन्म झाला. लगाया जोधपूर येथे आपल्या भावाला भेटण्यासाठी आले होते. मात्र, ते पुन्हा पाकिस्तानात जाऊ शकले नाहीत.

पाकिस्तानच्या विविध जिल्ह्यांतील लोक सध्या अटारी सीमेवर आहेत. कारण, पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना पाकिस्तानात प्रवेश नाकारला आहे. ही कुटुंबे अटारी आंतरराष्ट्रीय चेकपोस्टजवळील पार्किंगमध्ये तळ ठोकून आहेत. स्थानिक लोक त्यांना दिवसातून तीन वेळचे जेवण, औषधे आणि कपडे देत आहेत.

The baby was born on the Indo-Pak border, a Pakistani couple named the border

महत्त्वाच्या बातम्या