जम्मू -काश्मिरात दहशतवाद्यांचा सामान्य नागरिकांवर भ्याड हल्ला, गोळीबारात दोन शिक्षकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Jammu and Kashmir Terrorists open fire on civilians in Eidgah area of ​​Srinagar Two Teachers Died, Many injured

Jammu and Kashmir Terrorists open fire : जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील ईदगाह भागात गुरुवारी दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांवर गोळीबार केला. या घटनेत दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या दोन्ही शिक्षकांची ओळख पटली आहे. पहिला पुरुष शिक्षक आहे, जो काश्मिरी पंडित आहे आणि सध्या बटामालू श्रीनगरमध्ये राहत होता. जम्मू येथील दीपक चंद असे त्यांचे नाव आहे. Jammu and Kashmir Terrorists open fire on civilians in Eidgah area of ​​Srinagar Two Teachers Died, Many injured


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील ईदगाह भागात गुरुवारी दहशतवाद्यांनी निरपराध नागरिकांवर गोळीबार केला. या घटनेत दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या दोन्ही शिक्षकांची ओळख पटली आहे. पहिला पुरुष शिक्षक आहे, जो काश्मिरी पंडित आहे आणि सध्या बटामालू श्रीनगरमध्ये राहत होता. जम्मू येथील दीपक चंद असे त्यांचे नाव आहे.

दुसरी मृत एक महिला शिक्षिका आहे, त्या शाळेच्या प्रिन्सिपल होत्या. श्रीनगरच्या अलोची बाग येथील रहिवासी आरपी सिंह यांची पत्नी सतीदनेर कौर असे त्यांचे नाव आहे. या घटनेबाबत जम्मू -काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, नागरिकांना लक्ष्य करण्याच्या या अलीकडील घटना येथे भीती, जातीय द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आहेत. स्थानिक संस्कृती आणि मूल्यांना लक्ष्य करून स्थानिक काश्मिरी मुस्लिमांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. तसेच पाकिस्तानमधील एजन्सींच्या सूचनेनुसार हे केले जात असल्याचेही ते म्हणाले.

ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला शोक

जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेबद्दल ट्विट केले आणि म्हटले की, पुन्हा एकदा श्रीनगरमधून धक्कादायक बातमी आली आहे. टार्गेट किलिंगचा आणखी एक सेट, यावेळी शहरातील ईदगाह परिसरातील एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची हत्या. या अमानवीय कृत्यासाठी निषेध पुरेसा नाही, परंतु मी मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना करतो.

Jammu and Kashmir Terrorists open fire on civilians in Eidgah area of ​​Srinagar Two Teachers Died, Many injured

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात