विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेशात नेमक्या किती जागा लढणार? किती उमेदवार देणार?, याची अजून तपशीलवार माहिती जाहीर झालेली नाही. पण पक्षाने स्टार कॅम्पेनरची 26 जणांची भलीमोठी यादी प्रसिद्ध केली आहे. How many candidates in NCP Uttar Pradesh ?, no information; But the list of 26 star campaigners !!
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याचे मुंबईत जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष के. के. शर्मा यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली. 12 जानेवारी या दिवशी त्यांची अनुपशहर मतदारसंघातून समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा देखील झाली. परंतु नंतर दोनच दिवसांमध्ये समाजवादी पार्टीने के. के. शर्मा यांना दिलेला पाठिंबा काढून घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस नेमके उत्तर प्रदेशात किती उमेदवार उभे करणार आहे याचे तपशील जाहीर झालेले नाहीत.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीतील मुख्यालयातून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून स्टार कॅम्पेनरची 26 जणांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाची सर्व राष्ट्रीय कार्यकारणी उत्तर प्रदेशात प्रत्येक मतदार संघात प्रचाराला जाणार आहे. त्याचबरोबर प्रदेश कार्यकारणीतले चिटणीस, उपाध्यक्ष यांचाही स्टार कॅम्पेनरचा यादीत समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेमके कोण उमेदवार लढणार? ते कोणत्या जागा लढवणार?, याचे तपशील माहिती नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार कॅम्पेनरची यादी प्रसिद्ध केल्याने तो राजकीय वर्तुळात खोचक चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादीच्या स्टार कॅम्पेनरमध्ये शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, नवाब मलिक, के. के. शर्मा, सिराज मेहंदी दिल्ली चे प्रदेशाध्यक्ष योगानंद शास्त्री आदींचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App