सावरकरांना “वीर” उपाधी कोणा सरकारने नाही दिली, तर १३० कोटी जनतेने मनापासून दिलीय; अमित शहांचा विरोधकांना टोला


वृत्तसंस्था

अंदमान – ब्रिटिशांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांवर अनन्वित अत्याचार केले. पण तुम्ही कितीही अत्याचार करा, या देशाचा स्वातंत्र्य मिळविण्याची जन्मसिध्द अधिकार आणि इच्छा तुम्ही मारू शकत नाही, हा संदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या काळ कोठडीतून संपूर्ण जगाला दिला, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले.government gave Savarkar the title of “Veer”, but 130 crore people gave it wholeheartedly; Amit Shah’s opponents tola

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज विजयादशमीचा सीमोल्लंघनाचा मुहूर्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संरक्षण क्षेत्रातल्या ७ कंपन्या अर्पण केल्या, तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांसह हजारो स्वातंत्र्यवीरांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.



आपला दोन दिवसांचा गोवा दौरा आटोपून अमित शहा आज दुपारी अंदमानला पोहोचले. तेथे जाताच त्यांनी शहीद स्मारकारवर पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील योध्द्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी सेल्युलर जेलमधल्या सावरकर कोठडीत जाऊन स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

यानंतर झालेल्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सव सभेत अमित शहा म्हणाले, की सावरकरांनी या अंदमानच्या सेल्युलर जेलला आपल्या वास्तव्याने तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. ब्रिटिशांनी त्यांच्यावर आणि त्यांच्यासारख्या हजारो क्रांतिकारकांवर अनन्वित अत्याचार केले. बैलाप्रमाणे कोलूला जुंपले.

पण सावरकरांचे मनोधैर्य ब्रिटिश तोडू शकले नाहीत. सावरकरांसह येथे त्यांचे बंधू बाबाराव, सचिंद्रनाथ संन्याल, बारिंद्र घोष, उल्हासकर दत्त, भाई परमानंद असे असंख्य क्रांतिकारक होते. त्यांच्या वास्तव्याने हे स्थान तीर्थस्थानासारखे पवित्र झाले आहे.

सावरकरांच्या बदनामीची मोहीम अनेकांनी चालविली पण सावरकरांच्या नावाआधी “वीर” हा शब्द या देशातल्या १३० कोटी जनतेने त्यांना बहाल केला आहे. तो शब्द इतिहासातून कोणीही पुसू शकणार नाही, असा इशारा अमित शहा यांनी दिला. यावेळी अमित शहा यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, पंजाब आणि बंगालमधील अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी जागविल्या. त्यांच्या योगदानाचा गौरव केला.

विजयादशमीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी देशाच्या संरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. स्वातंत्र्यानंतर देश शस्त्रसंपन्न झाला पाहिजे, असा ध्यास सावरकरांनी घेतला होता.

परंतु, त्याकडे तत्कालीन सरकारने दुर्लक्ष केले होते. आज सावरकरांच्या स्वप्नातला बलशाली भारत घडविण्याचे प्रयत्न मोदी सरकार करताना दिसत आहे. एवढेच नाही, तर सावरकरांचे नामाभिधान लावून हे प्रयत्न सुरू आहेत, असेच मोदी आणि शहा यांनी आजच्या आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

government gave Savarkar the title of “Veer”, but 130 crore people gave it wholeheartedly; Amit Shah’s opponents tola

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात