राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचे आणखी चार रुग्ण सापडले, परिस्थिती नियंत्रणात


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशाच्या राजधानीत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचे आणखी चार रुग्ण आढळले. अद्याप ओमिक्रॉनचा संसर्ग समुदायात पसरला नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दिलासाही त्यांनी दिला.Four patients of omicron found in Delhi

दिल्लीत ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सहावर गेली आहे. आरोग्यमंत्री जैन म्हणाले, की या सर्व रुग्णांना दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले.



आतापर्यंत परदेशातून आलेल्या ७४ जणांना अशा प्रकारे या रुग्णालयात पाठविले आहे. ओमिक्रॉनच्या संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. दिल्लीतील ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज मिळाला.

कोरोनाची चाचणी दोनदा निगेटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. हा रुग्ण टांझानियातून दोहाला गेला होता. दोहातून २ डिसेंबरला दिल्लीत दाखल झाला होता. दक्षिण आफ्रिकेत आठवडाभर राहिलेल्या या व्यक्तीला ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे होते.

Four patients of omicron found in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात