शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा ; इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार , दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही


शनिवारच्या चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-६० कमांडोंच्या सत्कारासाठी गृहमंत्री पाटील सोमवारी गडचिरोलीत आले होते. Five acres of land for farming to the families of martyred police personnel; Other demands will be proposed to the Cabinet, testified by Dilip Walse-Patil


विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या अभूतपूर्व यशानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील गडचिरोलीमध्ये दाखल झाले. गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोहोचताच त्यांनी शहीद स्मारकावर आदरांजली वाहिली.आपल्या संवादादरम्यान जवानांच्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले.

दरम्यान शनिवारच्या चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी आणि सी-६० कमांडोंच्या सत्कारासाठी गृहमंत्री पाटील सोमवारी गडचिरोलीत आले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.



नक्षलविरोधी अभियानात लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी पाच एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली. तसेच शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Five acres of land for farming to the families of martyred police personnel; Other demands will be proposed to the Cabinet, testified by Dilip Walse-Patil

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात