रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातच्या साबरकांठात दोन गटांमध्ये हाणामारी, अनेक वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या


गुजरातच्या हिम्मतनगर आणि खंभात शहरांमध्ये रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर दगडफेक करणाऱ्या आणि दुकाने आणि वाहनांचे नुकसान करणाऱ्या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.During the Ram Navami Yatra two groups clashed in Sabarkantha, Gujarat, several vehicles were set on fire, police fired tear gas canisters.


वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुजरातच्या हिम्मतनगर आणि खंभात शहरांमध्ये रविवारी रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर दगडफेक करणाऱ्या आणि दुकाने आणि वाहनांचे नुकसान करणाऱ्या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.

जखमींची संख्या अद्याप कळू शकलेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरातील छापरिया भागात दुपारी रामनवमीची मिरवणूक निघाली तेव्हा दोन समुदायांच्या लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली.



या संदर्भात अधिकाऱ्याने सांगितले की, “पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला.

आनंद जिल्ह्यातील खंभात येथे रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान हाणामारी झाली, ज्यामध्ये दोन गटांकडून दगडफेक करण्यात आली आणि दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले, असे नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजऱ्या होणाऱ्या रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.

During the Ram Navami Yatra two groups clashed in Sabarkantha, Gujarat, several vehicles were set on fire, police fired tear gas canisters.

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात