महानवमीच्या दिवशी अखिलेश यांनी दिल्या चक्क रामनवमीच्या शुभेच्छा, भाजपची सडकून टीका

विशेष प्रतिनिधी

लखनौ – समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी महानवमीच्या दिवशी चक्क रामनवमीनिमित्त शुभेच्छा देणारे ट्विट केले. त्यामुळे भाजप त्यांच्यावर तुटून पडला. नया नया हिंदू असे संबोधत अखिलेश यांची खिल्ली उडविण्यात आली.Akhilesh yadawas wrong twit targets him

अखिलेश यांनी आधी रामनवमीच्या उल्लेखाचे ट्विट केले. त्यातील चूक लक्षात येताच काही मिनिटांनी त्यांनी महानवमी अशी दुरुस्ती केली, पण तोपर्यंत सोशल मिडीयावर त्यांची दांडी उडाली होती. 

अखिलेश यांच्या ट्विटला प्रत्यूत्तर देताना भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी. म्हटले आहे की, करसेवकांवर गोळीबार करणारे निवडणूका जवळ आल्यानंतर हिंदू बनण्याचे ढोंग करतात तेव्हा असे होते,

रामनवमीचा उल्लेख करणारे ट्विट काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सुद्धा केले होते. भाजप नेत्यांनी ते रिट्विट केले, मात्र त्याचे इतके तीव्र पडसाद उमटले नाहीत.लखनौमध्ये भगवान परशुराम यांची १०८ फुटी मुर्ती उभारण्याची घोषणा सपाने केली आहे. त्याचीही आता भाजपकडून खिल्ली उडविली जात आहे.

Akhilesh yadawas wrong twit targets him

महत्त्वाच्या बातम्या