आनंदराव अडसूळ यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला


विशेष प्रतिनिधी

मुंबई – शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.No bail for anand adsul

अडसूळ सिटी सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना खातेधारकांचे पैसे बेकायदेशीरपणे बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. त्यात सुमारे नऊशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, अशी फिर्याद आमदार रवी राणा यांनी केली आहे.


ईडीच्या नोटीसीनंतर आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली, सिटी को -ऑपरेटिव्ह बँकेतील ९८० कोटीचा घोटाळा

त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीला बोलविले होते; मात्र प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे सांगून अडसूळ ईडीसमोर हजर झाले नाहीत. ईडीने त्यांच्या कार्यालयावरही धाडी टाकल्या आहेत.

ईडीने दाखल केलेला प्राथमिक तपास अहवाल (ईसीआयआर) रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी अडसूळ यांनी याचिकेत केली होती. मात्र खंडपीठाने हा युक्तिवाद अमान्य केला आणि याचिका नामंजूर केली.

ईडीने चौकशी सुरू केल्यावर तब्येत ठणठणीत असतानाही अडसूळ प्रकृतीची सबब पुढे करत वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल झाले. त्यामुळे तपास कसा करणार, असा सवाल अतिरिक्त साॅलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.

No bail for anand adsul

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात