दीनदयाळ, अटलजींच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे काँग्रेस सरकार आल्यावर बदलायची का?; सिद्धरामय्या यांचा मोदी सरकारला खोचक सवाल


वृत्तसंस्था

बेंगळुरू : दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी आदींच्या नावाने सरकारी योजना आहेत. त्या योजनांची नावे बदलण्याची मागणी आम्ही करायची काय?, असा सवाल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे.Deendayal, should the names of government schemes named after Atalji be changed when the Congress government comes ?; Siddaramaiah’s sharp question to Modi government

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. जनसंघ नेते दीनदयाळ उपाध्याय, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे काँग्रेसने आपले सरकार आल्यावर बदलायची काय? एवढेच नाही तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने स्टेडियम आहे त्या स्टेडियमचे नाव देखील नंतर बदलायचे काय?, असा सवाल देखील सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.



राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. परंतु सिद्धरामय्या यांनी भाजप आणि जनसंघाच्या जुन्या नेत्यांची नावे घेऊन त्यांच्या नावाच्या सरकारी योजनांचा उल्लेख केला आहे.

त्याच बरोबर काँग्रेसची सत्ता आली तर त्यांच्या नावांच्या योजनांची ना नावे बदलण्याचे ही सूतोवाच केले आहे.बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका करताना जनसंघ आणि भाजपच्या नेत्यांची नावे घेऊन त्यांच्या नावाच्या सरकारी योजनांची नावे बदलण्याचे सूतोवाच केलेले नाही.

Deendayal, should the names of government schemes named after Atalji be changed when the Congress government comes ?; Siddaramaiah’s sharp question to Modi government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात