मध्य प्रदेश विधानसभेतून पप्पू, मिस्टर बंटाधार, ढोंगी, चोर ससूर शब्द हटविले


वृत्तसंस्था

भोपाळ – विधानसभेचे कामकाज सुचारू स्वरूपात चालावे. तेथे सभ्य शब्दांमध्ये वाद-विवाद व्हावेत. एकमेकांवर असभ्य शब्दांमध्ये टीका टिपण्या होऊ नयेत, यासाठी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस हे पक्ष एकजूट झाले आहेत.pappu, mr. bantadhar, chor, sasur words removed from madhya pradesh aseembly

मध्य प्रदेश विधानसभेत काल 38 पाणी पुस्तिका जारी करण्यात आली. यात विधानसभेत वापरण्यास बंदी घालण्यात आलेल्या ११६१ शब्दांचा समावेश आहे. यामध्ये पप्पू, मिस्टर बंटाधार, चोर, ससूर आदी शब्द विधानसभेच्या कामकाजातून हद्दपार करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.



1954 ते 2021 या कालखंडात मध्य प्रदेश विधानसभेत ज्या शेलक्या शब्दांनी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर प्रहार केले, असे हे शेलके शब्द आहेत. जे आता विधान सभेच्या कामकाजात वापरता येणार नाहीत. तसेच आधीच्या कामकाजातून देखील ते हटविण्यात आले आहेत.

काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना भाजपचे नेते पप्पू म्हणून हिणवायचे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार दिग्विजय सिंग यांना मिस्टर बंटाधार म्हणजे पदे आणि पैसे वाटप करणारे नेते असे संबोधित करायचे. हे आता यापुढे बंद होणार आहे.

चोर, निकम्मा, भ्रष्ट, तानाशाह या शब्दांवर देखील विधानसभेत वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या शब्दांचे संकलन जरी 1954 ते 2021 या कालावधीतले असले तरी 1990 ते 2014 या कालावधीत या शब्दांचा यामध्ये समावेश नाही.या पुस्तिकेचे प्रकाशन मध्य प्रदेश विधानसभाध्यक्षांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.

pappu, mr. bantadhar, chor, sasur words removed from madhya pradesh aseembly

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात