देवभूमी हिमाचल मध्ये काँग्रेसची गोमाता भक्तीची विटंबना; दारूच्या प्रत्येक बाटलीवर 10 रुपये गोमाता अधिभार!!


वृत्तसंस्था

शिमला : हिमाचल मध्ये भाजपचे सरकार घालून सत्तेवर आलेल्या काँग्रेसने गोमाता भक्तीची विटंबना केली आहे. देवभूमी हिमाचल प्रदेशात विकल्या जाणाऱ्या दारूच्या प्रत्येक बाटलीवर तिथल्या काँग्रेस सरकारने 10 रुपये अधिभार लावला आहे, पण या अधिभाराला सरकारने गोमाता अधिभार असे नाव दिले आहे. Cow cess of Rs 10/bottle to be imposed on sale of liquor bottles; move to fetch Rs 100 crore revenue per annum

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये ज्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत, त्यामध्ये गोवंशासंदर्भात देखील काही योजना आहेत. पण त्यासाठी विशिष्ट आर्थिक तरतूद मात्र दारू विक्रीतून ज्यादा 100 कोटी रुपये कमवून त्याद्वारे गोसेवा करण्याचे त्या काँग्रेस सरकारने निश्चित केले आहे आणि म्हणूनच दारूच्या प्रत्येक बाटलीवर 10 रुपये अधिभार लावून त्याला गोमाता अधिभार असे अर्थसंकल्पात संबोधले आहे. या अधिभारातून हिमाचल प्रदेशाला 100 कोटी रुपये जास्त उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.

कोणत्याही राज्याच्या अर्थसंकल्पात दारू वरील अधिभार किंवा विविध शुल्क वाढविणे ही सामान्य बाब आहे. अनेक राज्ये तसे करत असतात. पण हिमाचल मधील काँग्रेस सरकार वगळता बाकी कुठल्याही पक्षाच्या राज्य सरकारने त्या अधिभाराला कुठल्याही धार्मिक महत्त्वाच्या प्रतीकाचे नाव दिलेले नाही. हिमाचल मधल्या काँग्रेस सरकारने मात्र आपली गोभक्ती दाखविण्याची विटंबना करून दारूच्या प्रत्येक बाटली वरच्या 10 रुपये अधिभाराला गोमाता अधिभार असे म्हटले आहे.

Cow cess of Rs 10/bottle to be imposed on sale of liquor bottles; move to fetch Rs 100 crore revenue per annum

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात