योगी सरकराच्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ६३ गुन्हेगारांचा खात्मा; ५ हजारांहून अधिकांच्या मुसक्या आवळल्या!

CM YOGI

पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये तब्बल १० हजारांहून अधिक चकमकी

प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यानाथ यांचे सरकार आल्यापासून तेथील गुन्हेगारी जगताला धडकी भरली आहे. योगींनी सर्व गुन्हेगार, माफियांच्या मुसक्या आवळण्याचा धडकाच लावला आहे. याचा पार्श्वभूमीवर एक माहिती समोर आली आहे. ज्यावरून आपल्याला योगी स्टाईलचा अंदाज येऊ शकतो. 63 criminals ‘killed’ in police encounters under Yogi Adityanath rule in UP

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी माहिती दिली की गेल्या सहा वर्षांत राज्यात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये तब्बल दहा हजारांहून अधिक चकमकी झाल्या आहेत, ज्यामध्ये ६३ गुन्हेगार मारले गेले आहेत, तर एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.


भारतीय लष्कर अधिक बलशाली होणार! तब्बल ७० हजार कोटींच्या शस्त्रास्त्रे खरेदीस संरक्षण मंत्रालयाकडून मंजुरी


चकमकींच्या संख्येच्या बाबतीत, २०१७ पासून सर्वाधिक ३ हजार १५२ चकमकींसह मेरठ राज्यात अव्वल आहे, ज्यामध्ये ६३ गुन्हेगार मारले गेले आणि १ हजार ७०८ गुन्हेगार जखमी झाले. दरम्यान, पोलिसांच्या चकमकीत एक पोलीसही शहीद झाला, तर ४०१ पोलीस जखमी झाले आहेत. कारवाईदरम्यान एकूण ५ हजार ९६७ गुन्हेगार पकडले गेले आहेत.

“यूपी पोलिसांनी २०१७ पासून १० हजार ७१३ चकमकी केल्या आहेत, त्यापैकी सर्वाधिक ३ हजार १५२ मेरठ पोलिसांनी केल्या आहेत, त्यानंतर आग्रा पोलिसांनी १ हजार ८४४ चकमकी केल्या आहेत, ज्यात ४  हजार ६५४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, तर १४ घातक गुन्हेगार मारले गेले आणि ५५ पोलीस जखमी झाले आहेत. बरेलीत १ हजार ४९७ चकमकी झाल्या, येथे झालेल्या चकमकीत ३ हजार ४१० गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून ७ जण ठार झाले आहेत. याशिवाय बरेलीतील चकमकीत ४३७ गुन्हेगार जखमी झाले आहेत. या कारवाईत २९६ धाडसी पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत, तर एक पोलीस शहीद झाला आहे.

63 criminals killed in police encounters under Yogi Adityanath rule in UP

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात