Corona Updates : देशात २४ तासांत पहिल्यांदाच ३ लाखांच्या जवळ आढळले रुग्ण, सर्वाधिक २०२० मृत्यू

Corona Updates In India

Corona Updates : कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे समोर आले आहे. दररोजच्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, देशात मागच्या 24 तासांत 2020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. Corona Updates In India 2.94 lakh cases and 2020 death in just 24 hours


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त प्राणघातक असल्याचे समोर आले आहे. दररोजच्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूंमध्येही वाढ झाली आहे. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, देशात मागच्या 24 तासांत 2020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मागच्या 24 तासांत 2,94,115 नवीन रुग्णांची नोंद झाली. देशात एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह देशातील एकूण मृत्यूंचा आकडा वाढून 1,82,570 वर गेला आहे. तर आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 1,56,09,004 वर गेली आहे. देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 21,50,119 पर्यंत पोहोचली. संसर्ग झालेल्या लोकांच्या एकूण संख्येपैकी हे प्रमाण 13.8 टक्के आहे.

बरे होण्याचा दर 85 टक्क्यांपर्यंत

कोरोना संसर्गातून बरे होण्याचा दरही सातत्याने खालावत आहे. हे प्रमाण आता 85 टक्के झाले आहे. आकडेवारीनुसार, कोरोनातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1,32,69,863 झाली आहे. कोरोनामधील मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय पातळीवर घसरले असले, तरी ते महाराष्ट्रात 1.5 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 1.6 टक्के आहे.

आठ राज्यात 77 टक्के मृत्यू

77 टक्के मृत्यू केवळ आठ राज्यांत झाले. देशात 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 519 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर दिल्लीत 277, छत्तीसगडमध्ये 191, उत्तर प्रदेशात 162, गुजरातमध्ये 121, कर्नाटकात 149, पंजाबमध्ये 60 आणि मध्य प्रदेशात 77 जणांचा मृत्यू झाला. या आठ राज्यांमध्ये एकूण 1556 झाले. दिवसभरातील 2020 मृत्यूंच्या तुलनेत हे प्रमाण 77.02 टक्के आहे.

6 राज्यांत 60 टक्के बाधित

देशातील एकूण बाधितांपैकी केवळ 6 राज्यांत 60 टक्के आहेत. या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक 62,097 नवीन संक्रमणांची नोंद झाली. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 29574, दिल्लीत 28395, कर्नाटकात 21794, केरळमध्ये 19577 आणि छत्तीसगडमध्ये 15625 नवे कोरोना रुग्ण आढळले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट वादळ बनून आली आहे. तथापि, कोरोनाशी लढण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाउनचा वापर करण्याचा सल्लाही त्यांनी राज्यांना दिला. देशाला संबोधित करताना त्यांनी देशव्यापी लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारली आणि राज्यांनीही ते टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Corona Updates In India 2.94 lakh cases and 2020 death in just 24 hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात