जनरल मोटर्स कंपनीकडून १४०० कर्मचाऱ्यांना कामबंदीची नोटीस ; कामगार संघटना आक्रमक


वृत्तसंस्था

पिंपरी : जनरल मोटर्स कंपनीने 1419 कामगारांना कामबंदीची नोटीस दिल्याचे कामगार आयुक्तालयाला कळविले आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमधील वाद चिघळणार आहे. कामगारांना योग्य भरपाई न मिळाल्यास कामगार न्यायालयात जातील, असे कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. Notice of strike to 1400 employees from General Motors Company; Trade unions are aggressive

जनरल मोटर्स इंडिया लिमिटेडने तळेगाव औद्योगिक क्षेत्रात ऑटोमोबाईल वाहने आणि पॉवर ट्रेन इंजिन प्रकल्प उभारला होता. येथील उत्पादन 20 डिसेंबर 2020 रोजी थांबविले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये वाद सुरू आहेत.



या वादावर तोडगा न निघाल्याने जनरल मोटर्स कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापक बिना कोठाडिया यांनी औद्योगिक विवाद नियम 1957 अंतर्गत 1419 कामगारांना 16एप्रिल 2021 पासून कामावरून कमी केल्याचे पत्र अप्पर कामगार आयुक्तांना दिले. औद्योगिक अधिनियमांतर्गत कामगारांना भरपाई मिळण्याचा हक्क आहे. त्यांना नियमाप्रमाणे भरपाई दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनरल मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप भेगडे म्हणाले, कामगारांना विश्वासात न घेता, त्यांचे भविष्य सुरक्षित न करता जानेवारी 2020 मध्ये चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सला कंपनी विकली. गेल्या वर्षभरापासून कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेळेवर काम दिले जात नाही. कामबंदीची नोटीस हा दबावतंत्राचा भाग आहे.

Notice of strike to 1400 employees from General Motors Company; Trade unions are aggressive

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात