कोरोनाच्या तडाख्याने भारतातील कोट्यवधी लोक पुन्हा ढकलले गेले दारिद्रयरेषेखाली


कोरोना व्हायरसच्या तडाख्यने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाचे जीवनही दुष्कर झाले आहे. देशातील कोट्यवधी लोक पुन्हा एकदा दारिद्रयरेषेखाली ढकलले गेल्याचा दावा अहमदाबाद येथील अर्थशास्त्रज्ञांनी केला आहे. Corona strikes have pushed millions of people back into poverty in India


प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या तडाख्यने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाचे जीवनही दुष्कर झाले आहे. देशातील कोट्यवधी लोक पुन्हा एकदा दारिद्रयरेषेखाली ढकलले गेल्याचा दावा अहमदाबाद येथील अर्थशास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशातील अनेक राज्यांत निबंर्धांमुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका गरिबांना बसत आहे. २०२० मधील घटनांची पुनरावृत्ती होत आहे. स्थलांतरित मजूर गेल्या लॉकडाऊनच्या तडाख्यातून सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच आणखी एका लॉकडाऊनने त्यांचे कंबरडे मोडले आहे. मागास राज्यांतून दिल्ली व मुंबईसारख्या महानगरांत कामासाठी आलेले बहुतांश मजूर रोजंदारीवर काम करतात.

अहमदाबाद विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक जीमोल उन्नी यांच्या गणनेनुसार, या तथाकथित असंघटित अर्थव्यवस्थेत ४० कोटींपेक्षा जास्त लोक काम करतात. त्यात सर्वात मोठी संख्या शेतकामगारांची आहे. यानंतर बांधकाम क्षेत्रात सुमारे ५-६ कोटी मजूर लोक राबतात.भारतातील असंघटित क्षेत्र हे २.९ लाख कोटी डॉलर्सच्या देशांतर्गत मागणी आधारित अर्थव्यवस्थेचा जवळपास निम्मा हिस्सा आहे.



असंघटित मजुरांना युनियन आणि नेतेमंडळींचे संरक्षण मिळत नाही. यामुळे सरकारी मदतीपासूनही त्यांना वंचितच राहावे लागते. पोटाची खळगी भरल्यानंतर औषधोपचारांवर खर्च करण्याइतपही त्यांच्याकडे पैसा उरत नाही. कोरोना महामारीने त्यांची स्थिती आणखीच बिकट करून टाकली आहे.

सरकारी अंदाजानुसार, गेल्या वित्तवर्षात भारताचा जीडीपी वृद्धिदर उणे ८% नोंद झाला. १९५२ नंतर ही सर्वात मोठी घसरण आहे. या वित्तवर्षातही दोन अंकी वृद्धिदर गाठणे कठीण दिसत आहे. एसअँडपी ग्लोबलचे मुख्य अर्थतज्ज्ञ शॉन रोशेंनी भारताच्या जीडीपी वृद्धिदराचा आधीचा ११% चा अंदाज घटवून ९.८% केला आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणून देशातील कोट्यवधी लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. त्यांच्या राहणीमानावर त्याचा परिणाम झाला आहे. कोरोनाच्या लाटेत कसेबसे जगणे ऐवढेच त्यांच्या हातात राहिले आहे.

Corona strikes have pushed millions of people back into poverty in India

महत्वाच्या  बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात