प्रेषितांवरील वक्तव्याचा वाद : अरब देशातील सुपर मार्केटमध्ये इंडियन प्रोडक्ट बॅन, मालदीवमध्ये गोंधळ; मुंबई पोलिस नूपुर शर्मांना समन्स बजावणार


आखाती देशांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कतार, कुवेत आणि इराणने भारतीय राजदूतांना बोलावून निषेध व्यक्त केला आहे. या वक्तव्यावर कतार-कुवेतने भारत सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.Controversy over statement of apostles Indian product ban in Arab supermarkets, chaos in Maldives; Mumbai Police will issue summons to Nupur Sharma


वृत्तसंस्था

मुंबई : आखाती देशांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कतार, कुवेत आणि इराणने भारतीय राजदूतांना बोलावून निषेध व्यक्त केला आहे. या वक्तव्यावर कतार-कुवेतने भारत सरकारने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियानेही या विधानावर आक्षेप घेतला आहे. याशिवाय सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि इतर अरब देशांनी त्यांच्या सुपर स्टोअरमध्ये भारतीय उत्पादनांवर बंदी घातली आहे.

57 मुस्लिम देशांच्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी)ही याचा निषेध केला आहे. संघटनेने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले – भारतात मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक राज्यांमध्ये मुस्लिमांवर शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालून निर्बंध लादले जात आहेत.



इस्लामिक देश मालदीवच्या संसदेत या प्रकरणावरून गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारच्या मौनावर सवाल केला. याप्रकरणी सरकारचे मौन निराशाजनक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मालदीव सरकार याप्रकरणी काहीही बोलण्याचे टाळत आहे.

ओआयसीचे आरोप भारताने फेटाळले

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- भारत ओआयसी सचिवालयाच्या अनावश्यक आणि कोत्या मनाच्या टिप्पण्यांना स्पष्टपणे नाकारतो. भारत सरकार सर्व धर्मांचा आदर करते.

सौदी आणि बहरीनने या निर्णयाचे स्वागत केले

भाजपने तातडीने कारवाई करत प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. यानंतर भारताने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, जे काही चुकीचे चित्रण केले गेले आहे, ती भारत सरकारची अधिकृत भूमिका नाही. यासोबतच वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यावरही सरकारने भर दिला. सौदी अरेबिया आणि बहरीनने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आम्ही सर्व धर्म आणि त्यांच्या उपासकांचा आदर करतो, असे विधानही भाजपने जारी केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी एक पत्र जारी करून म्हटले आहे – भाजप हा सर्व धर्मांचा आदर करणारा पक्ष आहे.

आखाती देशांमध्ये 7.6 दशलक्ष भारतीय प्रवासी

ऐतिहासिकदृष्ट्या, भारत आणि आखाती देशांमधील संबंध खूप मजबूत आहेत. भारत आपल्या तेलाच्या गरजेचा मोठा भाग या देशांकडून आयात करतो. याशिवाय, परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 76 लाख भारतीय मध्य पूर्व देशांमध्ये काम करतात.

भारत आवश्यकतेपैकी 84% तेल विदेशातून आयात करतो. भारतीय अर्थव्यवस्था अद्याप कोरोना महामारीच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेली नाही. अशा स्थितीत हे प्रकरण आणखी चिघळल्यास देशाच्या आर्थिक आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते.

गल्फ कोऑपरेशन कौन्सिल म्हणजेच GCC (ज्यात कुवेत, कतार, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान आणि UAE यांचा समावेश आहे) सोबत भारताचा 2020-21 मध्ये 90 अब्ज डॉलरचा व्यापार होता. याशिवाय भारताला परकीय गंगाजळीचा मोठा हिस्सा येथून मिळतो.

नुपूर शर्मांनीही मागितली माफी

भाजपमधून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. शर्मा यांनी ट्विट करून लिहिले – टीव्ही डिबेटमध्ये माझ्या देवाविरोधात वादग्रस्त शब्द बोलले जात होते, जे मला सहन होत नव्हते. या रागात मी काहीतरी आक्षेपार्ह बोललो, ते वक्तव्य मी बिनशर्त परत घेते.

मुंबई पोलीस जारी करणार समन्स

प्रेषितांवरील वक्तव्यावरून नुपूर शर्मांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. त्याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मुंबई पोलीस लवकरच त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले की, मुंबई पोलीस भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना समन्स बजावतील, ज्यांना ज्ञा

Controversy over statement of apostles Indian product ban in Arab supermarkets, chaos in Maldives; Mumbai Police will issue summons to Nupur Sharma

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात