खुद्द पंकजा मुंडे यांना नसेल एवढी मराठी माध्यमांनाच त्यांच्या राजकीय भवितव्याची “काळजी”!!


राज्यसभा निवडणूक त्यापाठोपाठ येणारी विधानपरिषद निवडणूक आणि 3 जून रोजी येऊन गेलेली गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यात दस्तूरखुद्द पंकजा मुंडे यांना नसेल एवढी एवढ्या “काळजीने” मराठी माध्यमांनी त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी बातम्या दिल्या आहेत आणि विश्लेषण केले आहे!! Pankaja Munde himself is more concerned about his political future than the Marathi media

पंकजा मुंडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. मध्य प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या प्रभारी आहेत. तिथली संघटनात्मक बांधणी त्या करत आहेत पण याविषयी चकार शब्द न काढता पंकजा मुंडे विधान परिषदेवर जाणार का??, त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा महाराष्ट्रात पूर्ण होणार का??, पंकजा मुंडे जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहेत का??, त्यांनी मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा बोलून दाखवल्या नंतर त्यांचे पंख कापले गेले आहेत का?? वगैरे गोष्टींची चटकदार आणि चमकदार चर्चा मराठी माध्यमांनी चालवली आहे.



– मराठी माध्यमांचा स्वसमज!!

विशेष म्हणजे भाजपमधल्या सूत्रांच्या हवाल्याने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचे तिकीट मिळणार आणि मिळणार नाही, अशा दोन्ही बाजूच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. जणू काही मराठी माध्यमांनी बातम्या दिल्यामुळे पंकजा मुंडे यांना तिकीट मिळणार आहे अथवा त्यांचे तिकीट कापले जाणार आहे!!, असाच समज मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी स्वतःच करून घेतला आहे. भाजपची सूत्रे मराठी माध्यमांच्याच आधारे काम करतात असा दर्प यातून त्यांनी स्वतःहूनच जोपासला आहे!!

-“तिकीट वाटपाचा विषय सूत्रांपर्यंत पोहोचतो?

पण खरच वास्तविकता तशी आहे का??, याचा विचार केला तर भाजपमध्ये असेल किंवा काँग्रेसमध्ये असेल कोणीही राजकीय महत्वाकांक्षा बोलून दाखवली तर ती पूर्ण होतेच असे नाही!! मग अशा स्थितीत पंकजा मुंडे यांनी आपण राष्ट्रीय पातळीवर भाजपचे काम करत आहोत, असे सांगितल्यानंतर त्यांना प्रदेश पातळीवर काम मिळणार का?? मिळाले तर कोणते काम मिळेल?? त्यांना विधान परिषदेवर उमेदवारी मिळाली तर मग परळी विधानसभेच्या उमेदवारीचे काय??, वगैरे प्रश्नांच्या चर्चेचे गुऱ्हाळ लावण्यात काय मतलब आहे?? भाजपची सूत्रे इतक्या सहजतेने मराठी माध्यमांना माहिती तरी देत असतील का?? मूळात भाजपच्या सूत्रांपर्यंत तरी तिकीट वाटपासारखा क्रिटिकल विषय इतक्या सहजपणे पोहोचत असेल का?? भाजपची सूत्रे म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची सूत्रे आहेत का?? इतके साधे प्रश्नही मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींना पडत नाहीत!! ते बिनधास्त सूत्रांच्या हवाल्याने बातम्या दडपून देत असतात.

– भाजपचे काम माध्यम आधारित??

भाजपचे संघटनात्मक काम माध्यम आधारित नाही. सूत्रांच्या आधारे काँग्रेस-राष्ट्रवादी अथवा बाकीच्या पक्षांची रिपोर्टिंग करता येते आणि ते काही प्रमाणात विश्वासार्ह देखील असू शकते. पण त्या पद्धतीने भाजपचे रिपोर्टिंग सूत्रांच्या आधारे तितके विश्वासार्ह करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. वाजपेयी अडवाणींच्या भाजपपेक्षा मोदी – शहा नड्डा यांचा भाजप या अर्थाने वेगळा आहे!!

– माध्यमांची नुसती पतंगबाजी

अशा स्थितीत पंकजा मुंडे यांचे राजकीय भवितव्य खुद्द त्यांच्या हातात आणि त्याहीपेक्षा अधिक पक्षनेतृत्वाच्या हातात असताना आणि खऱ्या अर्थाने पक्षाची सूत्रे कोणतीच माहिती देत नसताना पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार अथवा नाही हे कल्पनाविलासाचे पतंग उडवण्याखेरीज शिवाय दुसरे काहीही नाही!! भाजप मधल्या सूत्रांच्या आधारे केलेले सिरीयस रिपोर्टिंग तर अजिबातच नाही.

Pankaja Munde himself is more concerned about his political future than the Marathi media

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात