अरबस्तानात घृणास्पद कृत्य : मोदींचा फोटो कचराकुंडीवर; देशभर संताप!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे अरब देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले असताना एक घृणास्पद प्रकार अर्बस्तानातूनच बाहेर आला आहे. त्या विरोधात भारतात संताप उसळताना दिसत आहे. अरब देशांमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो कचराकुंडी वर लावलेला आढळला आहे. Modi’s photo on trash; Outrage across the country

भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने अरबी देशातील कतार आणि कुवेतने तेथील भारतीय दुतावासाला माहिती देत या वक्तव्याचा निषेधही केला आहे. एकीकडे कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. तर दूसरीकडे हा वाद कायम असताना आता दूसरीकडे अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

या प्रकारानंतर काँग्रेसने हा फोटो ट्विट करत अरब देशातील या कृतीबद्दल संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी ट्वीटरवर एक फोटो ट्वीट करून त्यासह संताप व्यक्त करणारा मजकूर देखील लिहीला आहे.

काँग्रेस नेत्याचे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमचा विरोध देशात आहे, मोदी आणि भाजपला आणि देशात लोकशाही मार्गाने पराभूत करू. मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो दिसणे कदापी मान्य करणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी, असे ट्विट सुरेंद्र राजपूत यांनी केले आहे.

मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर दिल्लीतील भाजपा नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे बहरीन, कतार, कुवेत, इराण आणि ओमानसारख्या आखाती देशात भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

– इम्यूएल मॅक्रॉन

पंतप्रधान मोदींचा फोटो कचराकुंडीवर आढळल्याआधी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यूएल मॅक्रॉन यांच्या विरोधात निदर्शने करताना त्यांचे फोटो पायदळी तुडवले होते. फ्रान्समध्ये त्यांनी इस्लामी कट्टरवाद्यांविरुद्ध घेतलेल्या निर्णयामुळे इस्लामी देशांमध्ये मॅक्रॉन यांच्या विरोधात वातावरण तापवण्यासाठी या प्रकारचे कृत्य केले गेले होते.

Modi’s photo on trash; Outrage across the country

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात