उत्तर प्रदेशात निवडणुका स्वबळावर लढण्याची बुवा – भतीजाची घोषणा


विशेष प्रतिनिधी

लखनौ : बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे मायावती यांनी सांगितले आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही कोणत्याही प्रमुख पक्षाबरोबर युती करण्याची शक्यता फेटाळून लावत केवळ समविचारी अशा छोट्या पक्षांना बरोबर घेऊ असे सांगितले आहे. BSP, SP will contest polls on its own

बसपने असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमसह (अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहदुल) युतीची तयारी सुरु असल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले होते. त्याचे खंडन करताना मायावती म्हणाल्या की, ही बातमी पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी आणि निराधार आहे. त्यात सत्याचा एक टक्काही अंश नाही.



अकाली दलाबरोबरील युती पंजाबमधील निवडणुकीपुरती मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये ११७ जागा असून अकाली दलाने ९७, तर बसपने २० जागा असा जागावाटप करार केला आहे, असेही त्यांनी नमूद केले. ही निवडणूक पुढील वर्षाच्या प्रारंभी होणार आहे.

BSP, SP will contest polls on its own

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात