BJP spokesperson Sambit Patra : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि नेते संबित पात्रा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संबित पात्रा यांना पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. याआधी संबित पात्रा यांनी ओएनजीसीचे स्वतंत्र संचालकपदही भूषवले आहे. BJP spokesperson Sambit Patra appointed as chairman of ITDC
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि नेते संबित पात्रा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संबित पात्रा यांना पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. याआधी संबित पात्रा यांनी ओएनजीसीचे स्वतंत्र संचालकपदही भूषवले आहे. संबित पात्रा हे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक आहेत. ते आपल्या पक्षाची बाजू ठामपणे आणि आक्रमकपणे माध्यमांसमोर मांडताना दिसतात.
संबित पात्रा यांची सप्टेंबर 2017 मध्ये प्रमुख PSU पैकी एक ONGC चे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांची संचालकपदावर तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ओडिशातील पुरी मतदारसंघातून संबित पात्रा यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी तेथे जोरदार प्रचार केला, संबित पात्रा त्यांची पहिली लोकसभा निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यांना अटीतटीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. पात्रा यांचा बिजू जनता दल (बीजेडी) उमेदवार पिनाकी मिश्रा यांनी 11,700 मतांनी पराभव केला होता.
BJP spokesperson Sambit Patra appointed as chairman of ITDC
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App