मागास उत्तर प्रदेशचा प्रगत केरळ, महाराष्ट्राला धडा, ३३ जिल्हे कोरोनामुक्त, गेल्या २४ तासांत केवळ १० नवे रुग्ण


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील मागास म्हणविल्या जाणाºया उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची उत्तुंग कामगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या केरळ आणि महाराष्ट्र दररोज कोरोनाचे हजारो रुग्ण सापडत असताना उत्तर प्रदेशातील ३३ जिल्हे पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत केवळ १० नवे रुग्ण आढळले आहेत.Backward Uttar Pradesh’s lesson to advanced Kerala, Maharashtra’s, 33 districts corona free, only 10 new patients in last 24 hours in Uttar Pradesh

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासूनच योगी आदित्यनाथांनी युध्दपातळीवर काम सुरू केले. स्थलांतरीत मजुरांच्या प्रचंड समस्येला तोंड देत राज्यात कोरोना पसरवू दिला नाही. गंगेमध्ये कथित मृतदेह वाहण्यापासून ते आकडेवारी लपवित असल्यापर्यंत अनेक आरोप झाले. मात्र, योगी आदित्यनाथ काम करत राहिले. त्याचा प्रत्यय आता येत आहे.



राज्यातील तब्बल ३३ जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे केवळ १० नवीन रुग्ण आढळले आहेत. ६७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही नवीन रुग्ण आढळला नाही. या दरम्यान १६ रुग्ण बरे झाले आहेत. ३३ जिल्ह्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नसून हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.

अलिगड, अमरोहा, अयोध्या, बागपत, बलिया, बलरामपूर, बांदा, बस्ती, बहराइच, भदोही, बिजनौर, चंदौली, चित्रकूट, देवरिया, एटा, फतेहपूर, गाझीपूर, गोंडा, हमीरपूर, हापूर, हरदोई, हाथरस, कासगंज, कौशांबी, ललितपूर, महोबा, मुरादाबाद, मुझफ्फरनगर, पीलीभीत, रामपूर, शामली, सिद्धार्थनगर आणि सोनभद्र हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्याचा पॉझिटिव्हीटी दर 0.0१ पेक्षा कमी झाला आहे आणि रिकव्हरी दर ९८.७ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल सात कोटी ४४ लाख ९५ हजार ४०६ कोरोना सँपलची तपासणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना व्यवस्थापनासाठी गठित केलेल्या टीमशी झालेल्या बैठकीत सांगितले की, अग्रेसिव्ह ट्रेसिंग, टेस्टिंग आणि लगेचच ट्रीटमेंट असे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर प्रभावी नियंत्रण असताना परिस्थिती सामान्य होत आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील परिस्थिती बरी आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे एकही सक्रिय प्रकरण नाही. दररोज सरासरी अडीच लाख कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. सात कोटींपेक्षा जास्त लोकांनी लसीचा किमान एक डोस दिला घेतला आहे.

Backward Uttar Pradesh’s lesson to advanced Kerala, Maharashtra’s, 33 districts corona free, only 10 new patients in last 24 hours in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात