वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर चर्चा करण्यात आली. ही लाट सप्टेंबर आणि ऑक्टोंबर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काय तयारी केली आहे, याचा आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे. presence of Prime Minister Narendra Modi Discussion on the third wave of corona at the high-level meeting
कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमेचा धडाका केंद्र सरकारने लावला आहे. अर्ध्या लोकसंख्येला कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस दिले आहेत. आजअखेर ७२ कोटींवर डोस दिले आहेत. त्यात १८ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. दरम्यान देशात कोरोना रुग्णांची २४ तासातील संख्या ३४९७३ झाली असून २६० जणांचा बळी गेला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी असे म्हटले आहे, की देश दुसऱ्या लाटेतून बाहेर पडलेला नाही. केरळात २४ तासात २६२०० रुग्ण सापडले असून त्याखालोखाल महाराष्ट्रात ४९१२ रुग्ण सापडले आहेत. देशातील एकूण ३५ जिल्ह्यात संसर्ग दर १० टक्के असून ३० जिल्ह्यात तो ५ ते १० टक्के आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात महाराष्ट्र राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू केली आहे.
आरोग्य स्वयंसेवक सज्ज
तिसरी लाट आल्यास ६.६६ लाख आरोग्य स्वयंसेवक सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी दिली. जुलैत ४ लाख आरोग्य स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. एकूण ४३ दिवसात ६.८८ लाख आरोग्य स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले असून लवकरच हा आ़कडा ८ लाख होईल.
लसीकरणाचे महत्त्व…
कोरोनासि लस घेतल्यास रुग्णालयात जाण्याची शक्यता टळते, असे संशोधनात दिसून आले. अमेरिकेतील दोनशे रुग्णालयात प्रयोग करण्यात आले. हे संशोधन ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदींच्या आधारे हे संशोधन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त लस घेऊन स्वतःचा बचाव आणि संक्रमणापासून संरक्षण करून घ्यावे असे आवाहन कारण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App