अमित शहांच्या दौऱ्यानंतरच ईशान्य भारतातील परिस्थीती का बिघडली – अशोक गेहलोत यांचा भाजपला सवाल


विशेष प्रतिनिधी

जयपूर – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी ईशान्येतील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर परिस्थिती अचानक का बिघडली याविषयी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशातील जनतेला विश्वासात घेऊन खुलासा केला पाहिजे अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.Ashok Gehlote targets BJP

ते म्हणाले, मिझोराम आणि आसाम यांच्यातील सीमावादावर केंद्र सरकारने लवकर तोडगा काढलाच पाहिजे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली पाहिजे. या दोन राज्यांमधील तणाव हा तीव्र चिंतेचा मुद्दा आहे.



आपल्या नागरिकांनी दुसऱ्या राज्यात प्रवास करू नये अशी मार्गदर्शक सूचना देशाच्या इतिहासात प्रथमच एका राज्याने जारी केली आहे. मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि त्या राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदविला आहे. सीमेवर सुरक्षा दलांचे जवान प्रचंड संख्येने तैनात करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Ashok Gehlote targets BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात