मुंबईतल्या “जीना हाऊस”चे नेमके काय होणार…??; गृहमंत्री अमित शहांकडे आली “ही” मागणी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पाकिस्तानचे निर्माते महंमद अली जीना यांचे मुंबईतले निवासस्थान “जीना हाऊस” याचे काय होणार आहे…?? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या बाबत एक मागणी करण्यात आली आहे. जीना हाऊसचा ताबा भारत सरकारकडे आहे. त्या वास्तूचे रूपांतर दक्षिण आशियायी कला आणि सांस्कृतिक केंद्रात करण्याची मागणी भाजपचे मुंबई शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. In a meeting with Union Home Minister Amit Shah, Mumbai BJP President Mangal Prabhat Lodha requested him to convert Jinnah House in Mumbai into South Asia Centre for Art and Culture

मंगलप्रभात लोढा यांनी नवी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन वरील मागणी केली. त्यांनी या मागणीचे पत्र अमित शहा यांना दिले. जीना हाऊस हे स्वातंत्र्यपूर्व काळात महंमद अली जीना यांचे निवासस्थान होते. तेथेच महात्मा गांधी आणि जीना यांच्यात स्वातंत्र्याबद्दलच्या वाटाघाटी झाल्या होत्या.

महमंद अली जीना पाकिस्तानात निघून गेल्यानंतर त्यावेळच्या कायद्यानुसार त्यांची ही मालमत्ता भारत सरकारच्या ताब्यात आली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी पाकिस्तानी सरकारने ती वास्तू आपल्या व्यापारी दूतावासासाठी मागितली होती. परंतु, विविध सरकारांनी या मागणीवर नकार दिला होता.

२०१७ मध्ये शत्रू संपत्ती अधिनियमात बदल करून त्याचे हस्तांतर पाकिस्तानाला करता येणार नाही हे सुनिश्चित करण्यात आले आहे.

आता या वास्तूचे रूपांतर दक्षिण आशियायी कला आणि सांस्कृतिक केंद्रात करावे, अशी मागणी मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. त्यावर राजकीय चर्चा सुरू होते आहे.

In a meeting with Union Home Minister Amit Shah, Mumbai BJP President Mangal Prabhat Lodha requested him to convert Jinnah House in Mumbai into South Asia Centre for Art and Culture

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात