महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाण साधला आहे.Maharashtra should be drug free but start from your master’s Kalanagar, Nitesh Rane targets Aditya Thackeray while criticizing Sanjay Raut

शिवसेना भवन हे आता कलेक्शन सेंटर झाले आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली होती. त्यावर बोलताना काही लोकांना गांजा पिऊन बोलण्याची सवय लागली असेल, असं मी वाचलं कुठेतरी. या सगळ्या विषयांवर आम्ही बोलण्यापेक्षा आमचे स्थानिक शाखाप्रमुख बोलतील, असे राऊत म्हणाले होते.त्यावर प्रत्युत्तर देताना राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एकदम बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे. पण, त्याची सुरुवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा. जेणेकरून रोज संध्याकाळी दिनोच्या घरी होणारे कार्यक्रम एकदाचेच संपतील.

आदित्य ठाकरे आणि अभिनेता दिनो मारिओ यांची मैत्री असून त्यांच्या पार्ट्या होतात असा आरोप नितेश राणे सातत्याने करत असतात. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणातही त्यांनी हा मुद्दा काढला होता. या निमित्ताने पुन्हा एकदा राणे यांनी आदित्य ठाकरे आणि दिनो मारिओ यांच्या संबंधावर भाष्य केले आहे.

संजय राऊत यांच्यावरही टीका करताना नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तसेच, नशामुक्त महाराष्ट्र बरोबर महिलांसाठी सुरक्षित महाराष्ट्र हाही कार्यक्रम तातडीने घेतला पाहिजे..जेणेकरून डॉ. स्वप्ना पाटकर सारख्या महिलांना न्याय भेटेल! बरोबर ना राऊत साहेब?

चित्रपट निर्मात्या स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा आरोप केला होता. बाळकडू या चित्रपटा निर्मात्या असलेल्या डॉ. पाटकर यांना पोलीसांनी बनावट डिग्री प्रकरणात अटक केली होती. तब्बल दीड महिन्यांनी त्यांना जामीन मिळाला. यामागे संजय राऊत असल्याचा आरोप डॉ. पाटकर यांनी केला आहे.

Maharashtra should be drug free but start from your master’s Kalanagar, Nitesh Rane targets Aditya Thackeray while criticizing Sanjay Raut

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर