CBSE CTET 2021 : परीक्षा होणार ऑनलाइन, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एक्झाम पॅटर्नमध्ये बदल.. वाचा सविस्तर!

CBSE CTET Will Be Held Online In December 2021 Or Jan 2022, Know The Change In Exam Pattern

CBSE CTET Will Be Held Online In December 2021 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीई) 2021 च्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले आहेत. ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. सीबीएसईने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अध्यापन व्यवसायात प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, डिसेंबर 2021/जानेवारी 2022 दरम्यान केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सीटीईटी 2021 आता ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CBSE CTET Will Be Held Online In December 2021 Or Jan 2022, Know The Change In Exam Pattern


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीई) 2021 च्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल केले आहेत. ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. सीबीएसईने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अध्यापन व्यवसायात प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी, डिसेंबर 2021/जानेवारी 2022 दरम्यान केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, सीटीईटी 2021 आता ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कागदाचा अपव्यय थांबवण्याचे प्रयत्न

सीबीएसईने म्हटले आहे की ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित केल्याने भविष्यातील शिक्षकांना संगणक शिकण्यास आणि अभ्यास करण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता आहे. यासोबतच प्रश्नपत्रिका आणि ओएमआर शीट छापल्यामुळे पेपरचा होणारा अपव्ययही रोखता येऊ शकतो.

अभ्यासक्रमात बदल, सीबीएसई फ्रेमवर्क जारी करेल

सीबीएसईने अभ्यासक्रमातही बदल केले आहेत. यावेळी वस्तुनिष्ठ ज्ञानाऐवजी, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्ह्विंग, रिझनिंग, संकल्पनांची समज आणि अॅप्लिकेशनचे ज्ञान तपासले जाईल. सीटीईटी 2021 संबंधित अधिकृत अधिसूचनेत लिहिले आहे की, नमुना ब्लूप्रिंट आणि प्रश्नांसह तपशीलवार मूल्यांकन फ्रेमवर्क सीबीएसई जारी करेल जेणेकरून इच्छुक सीटीईटी परीक्षेची तयारी करू शकतील.

CTET बाबत NEP 2020 मध्ये काय आहे?

राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 CTET 2021 ला प्रभावी करण्यासाठी उत्तम परीक्षा साहित्य विकसित करण्यावर भर देते. सामग्री आणि अध्यापन या दोन्ही दृष्टीने सीटीईटी प्रभावी करण्यास सुचवते. CTET 2021 मध्ये विषय शिकवण्यासाठी उमेदवारांच्या आकलनाची पडताळणी करण्यावर भर देईल.

CBSE CTET Will Be Held Online In December 2021 Or Jan 2022, Know The Change In Exam Pattern

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात