केंद्राचा मोठा दिलासा, अनेक औषधांच्या किमती केल्या कमी, रेमडेसिव्हिरही १९०० रुपयांनी स्वस्त, येथे पाहा यादी

Amid Corona crisis Modi government reduces prices of many drugs including Remedivir

Modi government reduces prices of many drugs : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली आहे. अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या या महामारीची दुसरी लाट सर्वात जास्त खतरनाक आहे. या सर्व अडचणींदरम्यान विविध औषधांच्या काळ्या बाजारामुळेही त्रस्त केले आहे. आता मोदी सरकारने या सर्वांवर दिलासा देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यातील एक म्हणजे अनेक औषधांच्या किमती कमी केल्या आहेत. Amid Corona crisis Modi government reduces prices of many drugs including Remedivir


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढली आहे. अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या या महामारीची दुसरी लाट सर्वात जास्त खतरनाक आहे. डबल म्यूटेंट व्हायरसमुळे रुग्णांच्या सेवेत गुंतलेल्या डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफलाही संसर्ग केला आहे. अनेक राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे विविध निर्बंध लादले आहेत. या सर्व अडचणींदरम्यान विविध औषधांच्या काळ्याबाजारामुळेही त्रस्त केले आहे. अनेक रुग्णालयांत बेड, ऑक्सिजनची कमतरता, औषधांच्या चढ्या किमती यामुळे सर्वसामान्य हैराण आहे. परंतु आता मोदी सरकारने या सर्वांवर दिलासा देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. त्यातील एक म्हणजे अनेक औषधांच्या किमती कमी केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी अनेक राज्यांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी काल एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यात राज्यांशी ताळमेळ बसवून उत्पादन वाढवून योग्य वितरणाचे निर्देश दिले आहेत. आता केंद्र सरकारने कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले औषध रेमडेसिव्हिरची किंमत 5400 वरून घटवून 3500 हून कमी केली आहे.

सरकारने कॅडेलिया हेल्थकेयर लिमिटेडचे औषध REMDAC ची किंमत 2800 रुपयांवरून घटवून 899 केले आहे. याशिवाय सिंजेन इंटरनेशनल लिमिटेडचे औषध RemWin ला 3950 वरून घटवून 2450, सिप्लाचे CIPREMI ची किंमत 4000 हून घटवून 3000, मायलॅन फार्मासुटिकल्स लिमिटेडचे DESREMची किंमत 4800 रुपयांवरून घटवून 3400 करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने JUBI-R च्या किमतीतही 1300 रुपये कपातीची घोषणा केली आहे. हे औषध आधी 4700 रुपयांत मिळत होते. ते आता 3400 रुपयांत मिळू शकणार आहे. सरकारने याशिवाय COVIFOR च्या किमतीतही कपात केली आहे. हे औषध आता 5400 रुपयांऐवजी केवळ 3490 रुपयांत मिळेल.

पाहा संपूर्ण यादी…

Amid Corona crisis Modi government reduces prices of many drugs including Remedivir

 

Amid Corona crisis Modi government reduces prices of many drugs including Remedivir

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात