वृत्तसंस्था
भोपाळ : देशात विविध ठिकाणी रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये मुस्लिमाकडून हनुमान जयंती मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले तसेच फुलांची उधळण देखील करून त्यांनी सर्वधर्म समभावाची प्रचिती देखील दिली आहे. Welcome to Hanuman Jayanti procession from Muslims in Bhopal: Scattering of flowers
भोपाळमध्ये (मध्य प्रदेश) मुस्लिम समाजातील लोक शनिवारी फुलांचा वर्षाव करून हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचे स्वागत करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
एका मुस्लिम व्यक्तीने सांगितले, “भोपाळची हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे… भविष्यातही चालेल.” विशेष म्हणजे भोपाळमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App