कार अपघातामध्ये चालकाचा मृत्यू


मध्यरात्री घरी निघालेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने लोहमार्ग कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला धडकून एका कार चालकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. Uncontrol Car driver accident in khadkhi, car driver dead and two girls injured in this accident


विशेष प्रतिनिधी

पुणे : मध्यरात्री घरी निघालेल्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने लोहमार्ग कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला धडकून एका कार चालकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या कारमधील दोन तरूणी जखमी झाले आहेत. हा प्रकार
१६ एप्रिल रोजी मध्यरात्री पावणे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

कार चालक प्रशांत आप्पा अमशेट्टे (35, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण,पुणे) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर ईशान विश्वजित गोडबोले (20) आणि प्रणित प्रमोद निम्हण (21, दोघेही रा. पाषाण,पुणे ) हे अपघातात गंभीर जखमी झाले.



सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सांगितले, अपघाता मृत्यू झालेला चालक प्रशांत हा खासगी चालक होता. त्याला मुलांना कॉलेजला सोडून घेऊन येण्यासाठी नेमले होते. 15 एप्रिल रोजी ईशान आणि प्रणित हे काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी 16 एप्रिलच्या मध्यरात्रीच्या सुमारास आरटीओ कार्यालयाकडून संचेतीकडे जाणार्‍या मार्गावरील लोहमार्ग कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कारवरील नियंत्रण सुटून भरधाव कार तेथील भिंतीला व गेटला धडकली. या गंभीर अपघातात स्वतः प्रशांत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर मागे बसलेले ईशान आणि प्रणित हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक वैशाली सुळ गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Uncontrol Car driver accident in khadkhi, car driver dead and two girls injured in this accident

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात