उत्तर प्रदेशातील आरोग्य सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा, मात्र मागील सरकारच्य निष्क्रियतेमुळे योगी आदित्यनाथांची कामगिरी झाकोळली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या निती आयोगाने जारी केलेल्या हेल्थ इंडेक्सनुसार वर्षभरात उत्तर प्रदेशाने आरोग्य सुविधांमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाल्या आहेत. मात्र, यापूर्वीच्या सरकारांनी काहीच केले नसल्याने योगी आदित्यनाथ सरकारची कामगिरी झाकोळली गेली आहे.Unprecedented improvement in health facilities in Uttar Pradesh, but inefficiency of previous government overshadows Yogi Adityanath’s performance

उत्तर प्रदेश सध्या आरोग्य सुविधांबाबत तळाशी असल्याचे अहवालात म्हटले आहे.निती आयोगाने तयार केलेल्या हेल्थ इंडिक्सच्या चौथ्या अहवालानुसार आरोग्य सुविधांमध्ये देशात केरळ अव्वल तर उत्तर प्रदेश तळाशी आहे. हा अहवाल तयार करताना सन २०१९-२० दरम्यानच्या कामगिरीचा विचार करण्यात आला आहे.



निती आयोगाने तयार केलेल्या या अहवालामध्ये तामिळनाडू आणि तेलंगण ही दाक्षिणात्य राज्ये अनुक्रमे दुसºया आणि तिसºया क्रमांकावर आहेत. या यादीमधील तिन्ही अव्वल राज्य ही दक्षिण भारतामधील आहेत. उत्तर प्रदेश हे एकंदरित कामगिरीच्या आधारे तळाशी आहे.

मात्र त्याचवेळी सन २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० च्या कालावधीमध्ये अभूतपूर्व सुधारणा करण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेशने अव्वल क्रमांक पटकावल्याचं अहवालात म्हटले आहे.छोट्या राज्यांचा विचार केला असता मिझोरम हे सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य ठरलं

असून अभूतपूर्व सुधारणेच्या बाबतीतही मिझोरमनेच बाजी मारलीय. तर आरोग्य क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वात तळाशी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरचा क्रमांक लागला आहे. मात्र त्याचवेळी या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये अभूतपूर्व पद्धतीने आरोग्यसेवांमध्ये सुधारणा होत असल्याने त्यांना सुधारणांच्या बाबतीत अव्वल क्रमांक देण्यात आलाय.

Unprecedented improvement in health facilities in Uttar Pradesh, but inefficiency of previous government overshadows Yogi Adityanath’s performance

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात