उत्तर प्रदेशात भाजप विजयी चौकार मारले; कासगंजधून भाजप विजय यात्रेला अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशात 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकून भारतीय जनता पार्टी चौकार मारेल, असा आत्मविश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. आज उत्तर प्रदेशातील कासगंज येथे भाजपच्या विजय यात्रेची सुरुवात अमित शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.UP BJP vijay yatra from kasganj

उत्तर प्रदेशात 2014 पासून सलग तीन निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. 2014 ची लोकसभा निवडणूक, 2017 ची विधानसभा निवडणूक, 2019 ची लोकसभा निवडणूक या तीनही निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने भाजपला भरभरून पाठिंबा दिला आहे.



 

2022 मध्ये चौथी निवडणूक जिंकून भाजपचे विजयाचा चौकार मारेल, असा आत्मविश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील, असाही दावा त्यांनी केला आहे.

काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर तसेच विविध विकास प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करते आहे. एकट्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरमध्ये 900 कोटी रुपयांचे काम होणार आहे. याकडे अमित शहा यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे विकासाची महागंगा वाहते आहे, तर दुसरीकडे बुआ – बबुआ यांचे जातिनिष्ठ पक्ष आणि तिसरीकडे बहिण भावंडांचा पक्ष असे परिवारवादी पक्ष भाजपशी लढत आहेत.

भाजपच्या विरोधी पक्षांना स्वतःच्या परिवाराचे उत्तर प्रदेशात राज्य आणायचे आहे. भाजपला परिवार वादाशी काही देणे घेणे नाही. विकास योजनांच्या बळावर भाजप 300 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असे अमित शहा म्हणाले.

योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी आधीच्या राजवटीत उत्तर प्रदेशात राजकीय परिवारांचे आणि माफिया परिवारांचे राज्य होते. आता राजकीय परिवार अजूनही अस्तित्वात आहेत, पण माफिया परिवार उत्तर प्रदेशातून पळून गेले आहेत किंवा सगळे माफिया आपल्या गुंड सहकाऱ्यांसमवेत तुरुंगात आहेत. त्यांच्या मालमत्ता न्यायालयाच्या आदेशाने जप्त झाले आहेत, याची आठवण अमित शहा यांनी करून दिली आहे..

UP BJP vijay yatra from kasganj

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात