Ulema Board : मुस्लिम उलेमा बोर्डाचे पवार + ठाकरे + नानांना पत्र; बटेंगे तो कटेंगचा महाराष्ट्रात प्रत्यय; वक्फ बोर्डासाठी मागितले 1000 कोटी रुपये!!

Ulema Board

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ulema Board उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या मंत्राचा प्रत्यय महाराष्ट्रात आला. मुस्लिम उलेमा बोर्डाने शरद पवार + उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या. यामध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी पाच टक्क्याची आरक्षण मर्यादा ओलांडून दुप्पट म्हणजे 10 % आरक्षणाची मागणी केली. त्याचबरोबर वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध करण्याचे लेखी आश्वासन मागून महाराष्ट्र वक्फ बोर्डासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी केली.Ulema Board



योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा मंत्र महाराष्ट्रातल्या जनतेला दिला. त्यावर संतापून शरद पवारांनी वेगवेगळ्या सभांमध्ये टीकेची झोड उठवली. समाजामध्ये तेढ उत्पन्न करण्यासाठी भाजप योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रात फिरवत असल्याचा आरोप केला.

परंतु आता मुस्लिम उलेमा बोर्डाने शरद पवार + उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून फक्त मुस्लिमांसाठीच तब्बल 17 मागण्या करून बटेंगे तो कटेंग याचाच प्रत्यय आणून दिला.

मुस्लिम उलेमा बोर्डाने मुस्लिमांसाठी महाराष्ट्रात 5 % ऐवजी 10 % टक्के आरक्षण महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची तरतूद, महाराष्ट्रातील सगळ्या मशिदींमधल्या इमामांना दरमहा 15000 रुपये मानधन, मुस्लिम तरुणांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य, वक्फ बोर्डामध्ये 500 तरुणांची भरती, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी, रामगिरी महाराज नितेश राणे यांना तुरुंगवास आदी आश्वासनांची लेखी मागणी केली आहे. या आश्वासनांच्या बदल्यामध्ये मुस्लिम महाराष्ट्रातल्या 48 जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुस्लिम तरुणांची मोठी फौज देण्याची तयारी मुस्लिम उलेमा बोर्डाने दाखविली आहे.

Ulema Board : Letter from Muslim Ulema Board to Pawar + Thackeray + Nana; Batenge is the suffix of Kateng in Maharashtra; 1000 Crores demanded for Waqf Board!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात