PM Modi : महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी कर्नाटकातल्या दारू दुकानदारांकडून काँग्रेसची 700 कोटींची वसुली!!

PM Modi

विशेष प्रतिनिधी

अकोला : PM Modi देशातल्या कुठले राज्यात काँग्रेसचे सरकार बनले की ते काँग्रेसच्या शाही परिवारासाठी ATM बनते. महाराष्ट्रातल्या निवडणूक खर्चासाठी काँग्रेसने कर्नाटक मधल्या दारू दुकानदारांकडून तब्बल 700 कोटींची वसुली केली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकोल्यातल्या जाहीर सभेत केला.PM Modi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा दुसरा दिवस अकोल्यातून सुरू झाला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर तिखट प्रहार केले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

– महायुती सरकारची पुढची पाच वर्ष कशी असतील, याची एक झलक महायुतीच्या वचननाम्यात दिसतेय. महिला सुरक्षा, महिलांना संधी, माझी लाडकी बहिण योजनेचा विस्तार. युवा वर्गासाठी लाखो रोजगार. विकासाच्या योजना. महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासाला डबल स्पीडने पुढे नेईल. युवा शिक्षा, रोजगार महायुतीच सरकार करील स्वप्न साकार!!

– महायुतीच्या या घोषणापत्रादरम्यान महाआघाडीच घोटाळापत्र आलय. देशाला माहितीय महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे हजारो कोटींचे घोटाळे, महाआघाडी म्हणजे पैसा काढणं, महाआघाडी म्हणजे टोकन मनी. महाआघाडी म्हणजे ट्रान्सफर पोस्टिंगचा धंदा!!

– काँग्रेसच एक उदहारण देतो. काँग्रेसच जिथे सरकार येतं, ते राज्य शाही कुटुंबाच ATM बनतं. सध्या हिमाचल, तेलंगण आणि कर्नाटक ही राज्य काँग्रेसच्या शाही कुटुंबाच ATM बनली आहेत. लोक सांगतायत सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावावर कर्नाटकमध्ये वसुली डबल झालीय. निवडणूक महाराष्ट्रात वसुली डबल झाली कर्नाटक, तेलंगणमध्ये!!

– कर्नाटकात काँग्रेसवाल्यांनी दारू दुकानदारांकडून 700 कोटी रुपयांची वसुली केलीय. तुम्ही कल्पना करु शकत नाही, काँग्रेस पार्टी घोटाळे करुन निवडणूक लढत आहे. ते निवडणूक जिंकल्यानंतर किती घोटाळे करतील? आपल्याला महाराष्ट्रात सावधान रहायचं आहे. महाराष्ट्राला महाआघाडीच्या महाघोटाळ्याच ATM बनू देऊ नका!!

PM Modi: Congress collects 700 crores from liquor shopkeepers in Karnataka for Maharashtra elections!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात