Prime Minister Modi : ‘जिथे काँग्रेसचे सरकार असते, ते राज्य राजघराण्याचे ATM बनते’

Prime Minister Modi

अकोल्यातील सभेतून पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा.


विशेष प्रतिनिधी

अकोला : Prime Minister Modi  निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्रातील अकोल्यात पोहोचले. जिथे त्यांनी भाजपच्या मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. विदर्भाचे आशीर्वाद माझ्यासाठी नेहमीच खास आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. असं त्यांनी सांगितलंPrime Minister Modi

मोदी म्हणाले की आज 9 नोव्हेंबर ही तारीख आहे आणि 9 नोव्हेंबर ही एक अतिशय ऐतिहासिक तारीख आहे, 2019 मध्ये या दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा निर्णय दिला होता. 9 नोव्हेंबर ही तारीख यासाठी देखील लक्षात राहील कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रत्येक धर्माच्या लोकांनी अत्यंत संवेदनशीलता दाखवली, राष्ट्र प्रथम ही भावना भारताची मोठी ताकद आहे.



2014 ते 2024 या दहा वर्षांत महाराष्ट्राने भाजपला मनापासून आशीर्वाद दिल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. महाराष्ट्राचा भाजपवर विश्वास असण्याचे कारण आहे. याचे कारण महाराष्ट्रातील जनतेची देशभक्ती आणि महाराष्ट्रातील जनतेची राजकीय समज आणि महाराष्ट्रातील जनतेची दूरदृष्टी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा आनंद माझ्यासाठी काही वेगळाच आहे.

आमचे सरकार केंद्रात सत्तेवर येऊन केवळ पाच महिने झाले आहेत. या पाच महिन्यांत लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प आहेत. या वाढवण बंदराची पायाभरणी काही काळापूर्वीच झाली आहे. फक्त त्याची किंमत सुमारे 80 हजार कोटी रुपये आहे आणि महाराष्ट्रात बांधले जाणारे हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर ठरणार आहे.

Prime Minister Modi said where Congress is in power the states become ATMs of the royal family

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात