तिरुमल्ला मंदिराचे मुख्य पुजारी म्हणतात जगनमोहन रेड्डी भगवान विष्णुचे अवतार, कोट्यवधी भाविकांचा अपमान केल्याची टीका

निवृत्तीचे वयावरून सेवा संपविलेल्या तिरुमल्ला मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा नेमणूक केल्यानंतर मुख्य पुजारी ए. व्ही. रमना दिक्षितुलू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी हे भगवान विष्णुचा अवतार असल्याचे म्हटले आहे. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे .Tirumalla temple preist says Jaganmohan Reddy is an incarnation of Lord Vishnu, criticized for insulting millions of devotees

भगवान बालाजीला सैतान असल्याचे म्हणणाऱ्याची विष्णुशी तुलना करणे म्हणजे ईश्वराचा आणि कोट्यवधी भाविकांचा अपमान असल्याचे भाजपाचे नेते सुनील देवधर यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

तिरुमल्ला : निवृत्तीचे वयावरून सेवा संपविलेल्या तिरुमल्ला मंदिरातील पुजाऱ्याची पुन्हा नेमणूक केल्यानंतर मुख्य पुजारी ए. व्ही. रमना दिक्षितुलू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी हे भगवान विष्णुचा अवतार असल्याचे म्हटले आहे. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे .

भगवान बालाजीला सैतान असल्याचे म्हणणाऱ्याची विष्णुशी तुलना करणे म्हणजे ईश्वराचा आणि कोट्यवधी भाविकांचा अपमान असल्याचे भाजपाचे नेते सुनील देवधर यांनी म्हटले आहे.मे २०२८ मध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमल्ला मंदिरातील पुजाऱ्यांचे निवृत्तीचे वय निश्चित केले होते.



मंदिराचे मुख्य पुजारी रमना दिक्षितुलू यांच्यासह बारा पारंपरिक पुजाऱ्यांना पदावरून दूर होण्यास भाग पाडले होते. त्याचबरोबर गोविंदाचार्य स्वामी मंदिर आणि श्री पद्मावती अमरावी मंदिराच्या पुजाऱ्यानाही निवृत्तीचे वय उलटून गेल्याने दूर केले होते.

यावरून पुजाºयांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायायलयाने तिरुपती देवस्थानला या पुजाऱ्यांची त्यांच्या पदावर पुन्हा स्थापना करण्याचे आदेश दिले होते. मात्र, देवस्थानने हा आदेश २०१८ पासून प्रलंबित ठेवला होता.

त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेले वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आपण सत्तेवर आल्यावर पुजाऱ्यांना पुन्हा योग्य मान दिला जाईल, असे म्हटले होते. सत्तेवर आल्यावर रेड्डी यांनी कायदा करून पुजाऱ्यांचे वारसा हक्क कायम ठेवले.

रमना दिक्षितुलू यांची मुख्य पुजारी पदावर नुकतीच पुन्हा नियुक्ती झाली. यावेळी बोलताना रमना दिक्षितुलू म्हणाले धर्मावर संकट येते तेव्हा भगवान विष्णू जन्म घेऊन संरक्षण करतात, असे म्हटले होते. जगनमोहन रेड्डी यांना त्यांनी भगवान विष्णू यांचा अवतार म्हटल्यामुळे रमना यांच्यावर टीका होत आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर म्हणाले, जामीनावर असलेल्या या मुख्यमंत्र्यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना पोसण्याचे काम केले आहे. भगवान बालाजी यांना सैतान म्हटले होते. त्यांना भगवान विष्णुंचा अवतार असल्याचे म्हणनू आपण केवळ ईश्वराचाच नव्हे तर कोट्यवधी भाविकांचा अपमान केला आहे.

Tirumalla temple preist says Jaganmohan Reddy is an incarnation of Lord Vishnu, criticized for insulting millions of devotees

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात