विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात रिलायन्स जिओच्या ५ जी सर्व्हीसची चर्चा सुरु झाली आहे. एक हजार शहरात अशी सेवा पुरविण्याची तयारी जिओ कंपनीने केली आहे. तसा निर्धारही कंपनीने केला आहे. The rise of Geo’s 5G service In the country; Determined to provide services in one thousand cities
एक हजार शहरांमध्ये ५ जी लॉन्च करण्याच्या तयारीत जिओ आहे. सध्या आरोग्यसेवा,औद्योगिक ऑटोमेशन क्षेत्रात कंपनी चाचणी करत आहे. त्यामुळे ४ जी नंतर ५ जी कडे देश लवकरच जाणार असून अधिक वेगवान नेटवर्कचा लाभ जनतेला होणार आहे.
५ जी नेटवर्कवर डेटा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यासाठी ३ डी नकाशे आणि रे ट्रेसिंग तंत्रज्ञान वापर कंपनी करणार आहे. त्यामुळे मजबूत नेटवर्क तयार करता येईल.
तंत्रज्ञाची टीम तैनात
जिओने अशी आधुनिक सेवा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त टीमची स्थापना केली आहे. ती भारतासह अमेरिकेतहही कार्यरत असेल. जे जगाच्या बरोबरीचे किंवा त्यापेक्षा अधिक चांगले तंत्रज्ञान पुरविण्यासाठी सक्षम असेल.युरोपमध्ये अशीच टीम तयार केली आहे.
दरम्यान, ५ जी सेवा तप्तरतेने देण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे. फायबर आणि विजेची उपलब्धताही वाढवली जात आहे. त्यामुळे जेव्हा ५ जी लॉंच होईल तेव्हा त्यात कोणताही व्यत्यय येणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App