राष्ट्रीय युद्ध स्मारकावर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान मोदींनी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. त्यांनी गळ्यात मणिपुरी गमछा आणि डोक्यावर काळी उत्तराखंडी टोपी घातली होती. या टोपीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर बनवलेला ब्रह्मकमळ होता. ही टोपी दिवंगत सीडीएस बिपिन रावत अनेकदा परिधान करताना दिसले होते.PM Modi wears special Uttarakhand hat, Manipuri gamcha with kurta-pajamas, special attire for every national festival
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय युद्ध स्मारकावर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान मोदींनी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. त्यांनी गळ्यात मणिपुरी गमछा आणि डोक्यावर काळी उत्तराखंडी टोपी घातली होती. या टोपीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर बनवलेला ब्रह्मकमळ होता. ही टोपी दिवंगत सीडीएस बिपिन रावत अनेकदा परिधान करताना दिसले होते.
प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांनी ही टोपी घालणे ही त्यांच्या वतीने जनरल रावत यांना श्रद्धांजली मानली जात आहे. त्यांच्या या कृतीला निवडणुकीचा रंगही दिला जातोय. उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये निवडणुका आहेत. अशा स्थितीत मोदींचा पेहरावही निवडणुकांना अनुरूप मानला जात आहे.
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून ट्विट
आज 73वें गणतंत्र दिवस के अवसर पर माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने ब्रह्मकमल से सुसज्जित देवभूमि उत्तराखण्ड की टोपी धारण कर हमारे राज्य की संस्कृति एवं परम्परा को गौरवान्वित किया है। #RepublicDay pic.twitter.com/9JDnZMHG7B — Pushkar Singh Dhami (Modi Ka Parivar) (@pushkardhami) January 26, 2022
आज 73वें गणतंत्र दिवस के अवसर पर माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने ब्रह्मकमल से सुसज्जित देवभूमि उत्तराखण्ड की टोपी धारण कर हमारे राज्य की संस्कृति एवं परम्परा को गौरवान्वित किया है। #RepublicDay pic.twitter.com/9JDnZMHG7B
— Pushkar Singh Dhami (Modi Ka Parivar) (@pushkardhami) January 26, 2022
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे – माननीय पंतप्रधानांनी ब्रह्मकमळाने सजलेली देवभूमी उत्तराखंडची टोपी परिधान करून आपल्या राज्याची संस्कृती आणि परंपरा यांचा गौरव केला आहे.
सीडीएस रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण
पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. सीडीएस रावतदेखील बर्याच इव्हेंटमध्ये त्यांच्या डोक्यावर अशीच टोपी घालताना दिसायचे. ते मूळ उत्तराखंडचे होते आणि ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल आहे. त्यामुळे ते त्यांच्या राज्याच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत होते. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शहीद रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्रत्येक राष्ट्रीय सणाला मोदींचा खास पेहराव
२०२१ मध्ये साजऱ्या झालेल्या ७२व्या प्रजासत्ताक दिनीही मोदींच्या पगडीची चर्चा झाली होती. पीएम मोदींनी जामनगरमधून हालारी पगडी परिधान केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App