महिला आरक्षण विधेयक मंजूर होताच विरोधकांचा महिलांमध्ये जातीवादी फूट पाडण्याचा डाव; मोदींचा घणाघात


वृत्तसंस्था

बिलासपूर : देशात महिला आरक्षण विधेयक मंजूर होतात विरोधक हादरले आहेत. त्यामुळेच त्यांनी आता महिलांमध्ये जातीवादी फूट पाडण्याचा डाव आखला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मधल्या बिलासपूर मध्ये केला. तिथे मोदींनी परिवर्तन संकल्प राहिलेला संबोधित केले. यामध्ये महिलांनी मोदींच्या भाषणाला जबरदस्त प्रतिसाद दिला. the opposition’s plan to create a casteist divide among women

मोदींनी आपल्या भाषणाचा सर्व भर महिला शक्ती आणि महिला आरक्षण या विषयावर ठेवला. महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर काँग्रेस सह सर्व विरोधकांनी आरक्षणात आरक्षण हा मुद्दा लावून धरत महिला आरक्षणात ओबीसी आरक्षण देण्याची मागणी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांना आपल्या भाषणातून एक्सपोज केले.

देशात महिलांची ताकद एकवटल्याने काँग्रेस आणि घमंडिया आघाडीला महिला आरक्षण विधेयकाला संसदेत पाठिंबा देणे भाग पडले, अन्यथा त्यांना या विधेयकाला पाठिंबा द्यायचाच नव्हता. पण संघटित महिला शक्तीने त्यांना मजबूर केले, असा टोला मोदींनी “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांना लगावला.

33 % महिला आरक्षण विधेयक महिलांच्या विकासाची ग्यारंटी आहे. पुढच्या एक हजार वर्षांच्या भविष्याची गॅरंटी आहे. पण हे विधेयक मोदी सरकारने मंजूर केल्यामुळे विरोधक हादरले आहेत. काँग्रेस आणि घमंडिया आघाडीचे नेते आता महिलांमध्ये जातीवादी फूट पाडण्याच्या कामाला लागले आहेत. सर्व महिला एकत्र झाल्या आणि त्यांनी मोदींना आशीर्वाद दिले, तर आपले काय होईल??, याची भीती त्यांना सतावते आहे. म्हणूनच आता त्यांनी जातीवादाचे पिल्लू बाहेर काढले आहे, असे शरसंधान मोदींनी साधले.

the opposition’s plan to create a casteist divide among women

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात