Terrorist Pannu : दहशतवादी पन्नूने ट्रूंडोचा केला पर्दाफाश, म्हटले ‘तो तीन वर्षांपासून…’

Terrorist Pannu

कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्याच्याच सूचनेवरून ही कारवाई केली आहे, असंही पन्नू म्हणाला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Terrorist Pannu  भारत आणि कॅनडामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने मोठा खुलासा केला आहे. सीबीसी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पन्नूने कबुली दिली आहे की तो गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडाच्या पंतप्रधानांच्या संपर्कात होता आणि त्यानेच भारताविरोधात माहिती पुरवली होती. ज्यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कारवाई केली आहे. यादरम्यान पन्नू म्हणाला की, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे विधान न्याय, कायद्याचे राज्य आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत कॅनडाची अटल वचनबद्धता दर्शवते.Terrorist Pannu



गेल्या वर्षी खलिस्तानी समर्थक निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाने भारतावर गंभीर आरोप केले होते. यानंतर सोमवारी कॅनडाने सहा भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने सांगितले की, कॅनडाच्या पंतप्रधानांनी त्याच्याच सूचनेवरून ही कारवाई केली आहे. यादरम्यान पन्नूने आरोप केला की त्याच्या संघटनेने (एसएफजे) स्वतः कॅनडाच्या पीएमओला माहिती दिली की भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी देशात हेरगिरीचे नेटवर्क कसे तयार केले, ज्याने हरदीपला सिंग निज्जरची हत्या करणाऱ्या एजंट्सना सहकार्य केले.

खलिस्तानी दहशतवादी पन्नू या वेळी म्हणाला की, कॅनडाचे शीख या नात्याने आमची इच्छा आहे की, व्हँकुव्हर आणि टोरंटो येथील भारतीय दूतावास कायमचे बंद करावेत. कारण यानंतर भारत राजनैतिक अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी इतर लोकांना पाठवेल आणि अशा प्रकारे भारताचे हेरगिरीचे जाळे संपणार नाही

Terrorist Pannu exposes Trudeau

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात